India Tour of England : भारतीय संघात सरप्राईज पॅकेज? हर्षित राणाचा संघात समावेश

India Tour of England : मंगळवारी हर्षितला संघाबरोबर इंग्लंडमध्येच ठेवून घेण्यात आलं. 

33
India Tour of England : भारतीय संघात सरप्राईज पॅकेज? हर्षित राणाचा संघात समावेश
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताकडून एक सरप्राईज पॅकेज बघायला मिळू शकतं. भारतीय ए संघातील तेज गोलंदाज हर्षित राणाचा समावेश भारताच्या संघात झाला आहे. मंगळवारी भारतीय ए संघ मायदेशी परतला तेव्हाच हर्षित भारतात न येता भारतीय संघाबरोबर लीड्सला गेला. तेव्हा नेमका तो कशासाठी इंग्लंडमध्ये राहिला हे स्पष्ट नव्हतं. पण, आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडमध्ये परतल्या परतल्या हा निर्णय झाला. बीसीसीआयने मंगळवारी रात्री मीडियाला ही माहिती दिली आहे. (India Tour of England)

(हेही वाचा – ज्वालामुखी उद्रेकामुळे दिल्लीहून बालीला जाणारे Air India चे विमान परतले !)

‘राष्ट्रीय निवड समितीने हर्षित राणाचा पहिल्या कसोटीसाठी भारताच्या संघात समावेश केला आहे. तो लीड्समध्ये इतर भारतीय ताफ्यात शामील होईल,’ असं बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. हर्षित इंग्लंड लायन्स विरुद्ध भारतीय ए संघाचा सदस्य होता. एका कसोटीत तो खेळला आणि यात त्याने एक बळीही घेतला होता. (India Tour of England)

(हेही वाचा – Iran-Israel conflict : अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने ; इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा)

आतापर्यंत हर्षित भारताकडून २ कसोटी, ५ एकदिवसीय आणि एक टी-२० सामन्यात खेळला आहे. संघात आधीच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाशदीप, शार्दूल ठाकूर आणि नितिश रेड्डी असे तेज गोलंदाज आहेत. असं असताना हर्षितला इंग्लंडमध्ये का ठेवलं? बुमरा ३ ते ४ कसोटी खेळण्याची शक्यता असल्यामुळे हर्षितला तिथे ठेवलं का, असे बरेच प्रश्न विचारले जात आहेत. बुमरा खेळणार नसलेली कसोटी पहिलीच असेल का हा आणखी एक प्रश्न आहे. कारण, हर्षितचा समावेशही एका कसोटीसाठी झाल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत बुमराहऐवजी हर्षित राणा खेळेल अशी शक्यताही दिसत आहे. (India Tour of England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.