-
ऋजुता लुकतुके
भारताचा युवा फलंदाज सर्फराझ खान कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सवर गेला आहे. त्याच्यासोबत त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खानही आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सर्फराझने तिथले काही फोटो लोकांसमोर आणले आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान अजिंक्यपदाचा अंतिम सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. सर्फराझ आणि त्याचा छोटा भाऊ मुशीरला नौशाद यांनीच घडवलं आहे. मुशीरनेही अलीकडेच आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. (India Tour of England)
यावेळी सर्फराझ आणि वडील नौशाद क्रिकेटचा मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सची क्रिकेट वारी करताना दिसत आहेत. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सर्फराझला स्थान मिळालेलं नाही. (India Tour of England)
(हेही वाचा – Robbery : गुन्हे शाखेकडून ३ कोटींच्या दरोड्याची उकल; तीन जण ताब्यात)
(हेही वाचा – Redevelopment : कामाठीपुरातील विकासाचा मार्ग मोकळा; ८००१ भाडेकरू आणि ८०० जमीन मालकांच्या स्वप्नांना पंख फुटणार)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सध्या रंगतदार अवस्थेत आहे. पहिल्या दोन दिवसांतच २८ गडी बाद झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी हा सामना संपण्याची आशा आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला त्यांनी १३८ धावांतच गुंडाळलं. कर्णधार पॅट कमिन्सने ६ गडी बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण अशी ७५ धावांची आघाडी मिळाली. पण, ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व मिळवलंय असं वाटत असतानाच त्यांचाही दुसरा डाव कोसळला. त्यांची अवस्था ७ बाद ७३ अशी झाली. (India Tour of England)
अखेर यष्टीरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने ४३ धावा करत ऑस्ट्रेलियाला निदान दीडशेच्या जवळ आणलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियाची आघाडी दोनशेच्या वर नेली आहे. सामन्याचे आणखी तीन दिवस बाकी आहेत. पण, गोलंदाजांचं वर्चस्व असलेला हा सामना लवकर संपण्याची शक्यता आहे. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community