
-
ऋजुता लुकतुके
भारत आणि इंग्लंड दरम्यानची पहिली कसोटी २० जूनपासून हेडिंग्ले इथं सुरू होत आहे. त्यासाठी भारतीय संघ लंडनहून गुरुवारी लीड्सला पोहोचला. खेळाडूंनी हा प्रवास लंडनच्या प्रसिद्ध ट्रेनने केला. त्यांच्यासाठी हा नवीन अनुभव होता आणि खेळाडूंनी त्याची मजाही लुटली. काहींना तर भारतात लहानपणी केलेला ट्रेनचा प्रवास यावेळी आठवला. बीसीसीआयने हा प्रवास आणि त्या दरम्यान खेळाडूंमध्ये रंगलेले खेळ यांचा एक व्हिडिओ चाहत्यांसाठी जारी केला आहे. (India Tour of England)
खेळाडू लंडनमधील हॉटेलमधून बाहेर पडण्यापासून ते रेल्वेमध्ये चढण्याबरोबरच नंतरच्या प्रवासाचं चित्रणही यात आहे. खेळाडूंचा मूडही चांगला होता. हॉटेलबाहेर जमलेल्या चाहत्यांनी त्यांनी सेल्फी घेऊ दिल्या. तर एकाने फोटो काढणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला त्यापूर्वी केस नीट करण्याचाही सल्ला दिला. (India Tour of England)
London 🚄 Leeds
‘Train’ing with #TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/I1gBsTu0PC
— BCCI (@BCCI) June 18, 2025
युवा फलंदाज ध्रुव जुरेलने लहानपणीच्या रेल्वे प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. ‘लहानपणी माझ्या वडिलांची बदली धरमशाला इथं झाली होती. मला घरून तिथे जातानाचा प्रवास खूप आवडायचा. खिडकीतून डोंगर, खोरं असं सगळं छान दिसायतं. खिडकीची जागा पकडायची आणि खिडकीत नाक खूपसून बसायचं असा माझा शिरस्ता होता,’ असं ध्रुव या व्हीडिओत सांगतो. तर वॉशिंग्टन सुंदरही सामने आणि शिबिरांसाठी केलेला रेल्वे प्रवास आठवताना दिसतो. (India Tour of England)
गोलंदाजीची प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल के. एल. राहुलचे फोटो घेत होता. तर मुंबईकर शार्दूल ठाकूर लहानपणी मुंबई लोकलमधून केलेल्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत होता. रेल्वे प्रवास झाल्यावर खेळाडू थेट लीड्सला पोहोचलेले दिसतात. इथेच हेडिंग्ले मैदानावर शुक्रवारपासून कसोटी सामना रंगणार आहे. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community