India Tour of England : इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय खेळाडूंचा पहिला सराव, काय काय घडलं?

सरावाचे फोटो बीसीसीआयने जारी केले आहेत

86

ऋजुता लुकतुके

नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या (Captain Shubman Gill) नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे. आणि तिथे गेल्यावर संघचं पहिलं सराव सत्रही रविवारी पार पडलं. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची तयारी भारतीय संघाने सुरू केलेली दिसतेय. बीसीसीआयने (BCCI) इंग्लंडमधील पहिल्या सरावाचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. भारतीय खेळाडूंचा भर खासकरून व्यायामावर होता. आणि खेळाडूंनी एकत्र यावं यासाठीचे काही प्रकार यात होते.  (India Tour of England)

(हेही वाचा – ७ हजार नेपाळी नागरिकांना सोडावी लागणार America; काय आहे कारण ?)

भारतीय संघ (Indian Cricket Team) सध्या लंडनमध्ये आहे. आणि लॉर्ड्सवर संघाचा सराव सुरू आहे. बीसीसीआयच्या व्हीडिओत सुरुवातीला शुभमन गिल आणि रिषभ पंत मैदानाच्या दिशेनं चालताना दिसतात. त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफही आहे. आणि त्यानंतर मैदानाच्या मध्यभागी संघातील खेळाडूंनी हडल म्हणजे फेर धरलेला दिसतो. यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आघाडीवर आहेत.

सरावाला सुरुवात फुटब़लच्या मैत्रीपूर्ण सामन्याने झाली. आणि तिथून जसप्रीत बुमरा आणि प्रसिध कृष्णा हे तेज गोलंदाज धावण्याचा सराव करताना दिसले. शेजारीच कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजाही वेगळ्या प्रकारे धावण्याचा सराव करत होते. तर रिषभ पंत फुटबॉल सामन्यादरम्यान जोशपूर्ण होता. अर्शदीप सिंग गौतम गंभीरशी गहन चर्चा करताना दिसला. रविवारी बीसीसीआयने भारतीय संघ लंडनमध्ये पोहोचल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. खेळाडू चांगल्या मूडमध्ये होते. आणि एकमेकांची खिल्ली उडवताना दिसले.

(हेही वाचा – Raja Raghuvanshi murder : गूढ उकलले; पत्नीला उत्तरप्रदेशातून अटक)

युवा फलंदाज साई सुदर्शन भारतीय संघात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. आणि या दौऱ्याबद्दल तो उत्सुक आहे. विराट कोहलीला आदर्श मानणारा साई सुदर्शन कसोटीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विराट कोहली आणि रोहीत शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिलीच कसोटी मालिका आहे. आणि इंग्लंडचा दौरा ही नवख्या संघासाठी पहिली परीक्षा असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.