India Tour of England : आगामी इंग्लंड दौऱ्याकरिता महिला संघाची निवड जाहीर, टीम इंडियाची घोषणा कधी?, वाचा संपूर्ण बातमी

India Tour of England : पुढील महिन्यात भारतीय महिला व पुरुष संघ दोन्ही इंग्लंड दौऱ्यावर(India Tour of England) जाणार आहेत. याच अनुषंगाने आता भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय महिला संघ इंग्लडविरुध्द दि. २८ जून ते दि. २२ जुलै दरम्यान सामने खेळणार आहेत. यादरम्यान, भारतीय महिला संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

41

India Tour of England : पुढील महिन्यात भारतीय महिला व पुरुष संघ दोन्ही इंग्लंड दौऱ्यावर(India Tour of England) जाणार आहेत. याच अनुषंगाने आता भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय महिला संघ इंग्लडविरुध्द दि. २८ जून ते दि. २२ जुलै दरम्यान सामने खेळणार आहेत. यादरम्यान, भारतीय महिला संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

(हेही वाचा बहिष्कार! बहिष्कार! बहिष्कार!, ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर येताच Aamir Khanची उफाळून आली देशभक्ती, नेटिझन्स म्हणाले… )

दरम्यान, टी-२० मालिका २८ जूनपासून सुरू होणार असून १२ जुलैला मालिकेतला शेवटचा सामना असणार आहे. तर एकदिवसीय मालिका १६ जुलैपासून सुरू होणार असून २२ जुलै रोजी मालिकेतला किंबहुना इंग्लंड दौऱ्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाची कप्तानीची धुरा हरमनप्रीत कौरवर असेल तर उपकर्णधार म्हणून स्मृती मंधानाकडे जबाबदारी असणार आहे.

टी-२० मालिकेकरिता भारतीय महिला संघ :-

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे

एकदिवसीय मालिकेकरिता भारतीय महिला संघ :-

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योति कौर,अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे

इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

२८ जून ते १२ जुलै २०२५(टी-२० मालिका)

पहिला टी-२० सामना, २८ जून (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ०७ वाजता)
दुसरा टी-२० सामना, ०१ जुलै (भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता)
तिसरा टी-२० सामना, ०४ जुलै(भारतीय वेळेनुसार रात्री ११.०५ वाजता)
चौथा टी-२० सामना, ०९ जुलै (भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता)
पाचवा टी-२० सामना, १२ जुलै (भारतीय वेळेनुसार रात्री ११.०५ वाजता)

१६ जुलै ते २२ जुलै २०२५ (एकदिवसीय मालिका)

पहिला एकदिवसीय सामना, १६ जुलै (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ०५.३० वाजता)
दुसरा एकदिवसीय सामना, १९ जुलै (भारतीय वेळेनुसार दुपारी ०३.३० वाजता)
तिसरा एकदिवसीय सामना, २२ जुलै (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ०५.३० वाजता)

टीम इंडियाची घोषणा कधी होणार? 

आगामी इंग्लंड दौऱ्याकरिता भारतीय महिला संघाची घोषणा झाल्यानंतर आता टीम इंडियाची घोषणा कधी होणार याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. त्यातच आता येत्या २३ मे रोजी टीम इंडियाची आगामी इंग्लंड दौऱ्याकरिता घोषणा होण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्याआधीच विराट कोहली, रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता दोन मुख्य शिलेदारांची उणीव भरून काढण्याची मुख्य जबाबदारी बीसीसीआयवर असणार आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदी कुणाची वर्णी लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (India Tour of England)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.