India Tour of England : भारत, इंग्लंड मालिका सोनी टीव्हीवर, डिजिटल प्रसारण जिओ हॉटस्टारवर

आयपीएलनंतर जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जात आहे.

84
India Tour of England : भारत, इंग्लंड मालिका सोनी टीव्हीवर, डिजिटल प्रसारण जिओ हॉटस्टारवर
India Tour of England : भारत, इंग्लंड मालिका सोनी टीव्हीवर, डिजिटल प्रसारण जिओ हॉटस्टारवर
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील (India’s Tour of England) कसोटी मालिकेचं डिजिटल प्रसारण जिओ-हॉटस्टारवर (Jio-Hotstar) होणार आहे. त्यामुळे संगणक, ओटीटी आणि मोबाईलवर ही कसोटी मालिका (Test series) पाहायची असेल तर तुम्हाला जिओ-हॉटस्टारचं (Jio-Hotstar) ॲप सबस्क्राईब करावं लागणार आहे. तर टीव्हीवरील प्रसारणाचे हक्क सोनी टीव्हीला (Sony TV) मिळाले आहेत. २० जूनला हेडिंग्ले इथं या मालिकेला सुरुवात होणार आहे. प्रसारण हक्कांवरील वाटाघाटी मागचा महिनाभर सुरू होत्या. सोनी टिव्हीकडे सुरुवातीला या मालिकेचे हक्क होते. पण, जिओ-हॉटस्टारने (Jio-Hotstar) त्यांच्याकडून डिजिटल हक्क मागून घेतले होते. अखेर हा सौदा पार पडला आहे.

(हेही वाचा – Maharashtra FYJC Admission 2025 : ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी)

भारतीय संघाच्या कसोटी दौऱ्याचा दुसरा टप्पा २०२६ मध्ये पार पडणार आहे. आणि यात दोन्ही संघ इंग्लंडमध्ये (England) ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे. हा दौराही जिओ-हॉटस्टार आणि सोनी टीव्ही मिळून दाखवणार आहेत. गेल्यावर्षी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंग्लंडमध्ये होणाऱ्या भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यांचे हक्क ८ वर्षांसाठी सोनी टीव्हीला विकले होते. २०३१ पर्यंत हा करार अबाधित आहे. पण, त्यांनीच डिजिटल हक्क स्टार व जिओला देण्यासाठी मध्यस्थी केल्याचं समजतंय. (India Tour of England)

२० जूनला हेडिंग्ले (Headingley) इथं पहिला कसोटी सामना रंगणार आहे. त्यानंतर उर्वरित चार कसोटी सामने २ जुलै (एजबॅस्टन), १० जुलै (लॉर्ड्स), २३ जुलै (ओल्ड ट्रॅफर्ड) आणि ३१ जुलै (ओव्हल) इथं होणार आहेत. या मालिकेपासूनच आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं (ICC Test Championship) नवीन चक्र सुरू होणार आहे. २०२७ पर्यंत ते चालेल. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कसोटी निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिलीच मालिका असेल. त्यामुळे नवीन खेळाडूंची इथं मोठी कसोटी असेल. (India Tour of England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.