
-
ऋजुता लुकतुके
इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ शुक्रवारपासून आपापसातील एक सराव सामना खेळत आहे. पण, त्या दरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर तातडीने भारतात परतल्याची बातमी पीटीआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. गंभीरच्या आईला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यामुळे गंभीर काही दिवसांसाठी दिल्लीत परतला आहे. भारतीय संघाच्या इंग्लंडला येण्यापूर्वीच गंभीर ए संघाबरोबर तिथे दाखल झाला होता. भारतीय ए संघाच्या इंग्लंड लायन्स विरुद्ध झालेल्या दोन अनधिकृत कसोटी त्याने जवळून पाहिल्या. (India Tour of England)
(हेही वाचा – WTC Final : दक्षिण आफ्रिका ऐतिहासिक कसोटी अजिंक्यपदाच्या जवळ; विजयासाठी हव्या ६९ धावा)
पण, मुख्य संघ लंडनमध्ये दाखल झाल्यावर गंभीरला काही काळासाठी का होईना मायदेशी परतावं लागलं आहे. त्याची आई सध्या आयसीयुमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ‘गंभीरच्या आईला बुधवारी ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे गुरुवारीच गंभीर आणि त्याचे कुटुंबीय लंडनमधून निघाले. ते सध्या नवी दिल्लीत त्याच्या आईबरोबर आहेत,’ असं पीटीआयने बातमीत म्हटलं आहे. तो कधी लंडनला परतणार ते अजून स्पष्ट नाही. गंभीरच्या अनुपस्थितीत रायन टेन ड्युसकाटे हे सहाय्यक प्रशिक्षक संघाची धुरा सांभाळणार आहेत. (India Tour of England)
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा जन्मदिवस देशी गोवंश संवर्धन दिवस म्हणुन साजरा होणार ; महायुती सरकारचा निर्णय)
🚨 BREAKING NEWS
Gautam Gambhir’s mother has suffered a heart attack.
🇮🇳 Team India’s head coach has rushed home from the England series.
— Wishing her strength and a speedy recovery 🙏 pic.twitter.com/SdMXdqe5js
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) June 13, 2025
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्येच भारतीय ए संघाबरोबर सराव सामना खेळत आहे. तर रायन यांच्याबरोबर फलंदाजीचे प्रशिक्षक सीतांशू कोटक आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलही आहेत. गंभीर एक आठवडा आपल्या आईबरोबर राहून एका आठवड्यात म्हणजे २० तारखेपूर्वी इंग्लंडला परतेल अशी शक्यता आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना २० तारखेपासून हेडिंग्ले इथं रंगणार आहे. या मालिकेत एकूण ५ कसोटी खेळवल्या जाणार आहेत. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community