
-
ऋजुता लुकतुके
इंग्लंडने मुख्य प्रशिक्षकपदी ब्रँडन मॅक्युलमची नेमणूक केल्यापासून आक्रमक क्रिकेटची कास धरली आहे. यालाच बॅझबॉल क्रिकेट असं कौतुकाने म्हटलं जातं. यातील एक भाग आहे तो कसोटीपूर्वी दोन दिवस आधीच संघ जाहीर करण्याचा आणि संघ जाहीर करताना त्यात जोखीम घेण्याची तयारीही हा संघ ठेवतो. आता भारताविरुद्ध घरच्या मैदानावर संघाला पाच कसोटी खेळायच्या आहेत आणि तेव्हाही संघाने हाच बाणा ठेवला आहे. २० तारखेला पहिली कसोटी सुरु होईल. त्याच्या ४८ तास आधी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे आणि यात तीन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. (India Tour of England)
तर ख्रिस वोक्स हा अनुभवी गोलंदाज संघात परतला आहे. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनच्या अनुपस्थितीत संघाला गोलंदाजीच्या क्षेत्रात अनुभवाची उणीव जाणवणार आहे. बाकी संघ तरुण खेळाडूंनी भरलेला आहे. आगामी मालिकेत भारतीय फलंदाजी विरुद्ध इंग्लिश फंलदाजी अशी लढत बघायला मिळणार आहे. इंग्लंडने जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन आणि सॅम कुक यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे. (India Tour of England)
(हेही वाचा – Sambhal Violence : सपा खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्यासह २३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल)
Team news from Leeds ahead of a BIG week 📋
Ready to face @BCCI 👊
— England Cricket (@englandcricket) June 18, 2025
असे म्हटले जात होते की, लीड्स कसोटीत इंग्लंड संघाने हिरव्या खेळपट्टीऐवजी चांगल्या फलंदाजीच्या खेळपट्टीची मागणी केली आहे. परंतु इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनकडे पाहता तसे वाटत नाही. कारण इंग्लंडने आपल्या संघात ४ गोलंदाज ठेवले आहेत, त्यापैकी एक फिरकी गोलंदाज शोएब बशीर आहे. इंग्लंड एका फिरकी गोलंदाजासह मैदानावर उतरला आहे आणि तीन वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त, त्यांच्याकडे कर्णधार बेन स्टोक्स आहे. जो स्वतः एक मध्यमगती गोलंदाज आहे. याचा अर्थ इंग्लंड चार वेगवान गोलंदाजांसह येईल आणि हे एक संकेत आहे की लीड्सच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. (India Tour of England)
जर आपण इंग्लंडच्या अकरा जणांच्या संघाकडे पाहिले तर, त्यात एक कमकुवत दुवा आहे तो अनुभवी तेज गोलंदाजांचा. अँडरसन आणि ब्रॉड दोघेही भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत होते, परंतु आता ते दोघेही निवृत्त झाले आहेत. इंग्लिश संघ ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर यांच्यावर अवलंबून आहे. इंग्लंड संघातील ख्रिस वोक्स हा एकमेव अनुभवी गोलंदाज आहे. यापूर्वी विराट कोहलीलाही वोक्सने सतावलं आहे. (India Tour of England)
इंग्लंडचा संघ – जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग व शोएब बशीर.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community