- ऋजुता लुकतुके
भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर सध्या भारतीय ए संघाबरोबर सराव सामना खेळत आहे. पहिल्या दिवसापासून के एल राहुल, ध्रुव जुरेल, शार्दूल ठाकूर, ऋषभ पंत यांनी सरावाची संधी साधली. तर शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) गोलंदाजीत चमक दाखवली. सगळ्यांचं लक्ष होतं ते तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहवर. कारण, या अख्ख्या सामन्यात त्याला एकही बळी मिळाला नाही. त्यामुळे पाठीच्या दुखण्यातून सावरलेल्या बुमराहला गोलंदाजीची लय इंग्लंडमध्ये सापडली का, हा प्रश्न होता. (India Tour of England)
या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआयनेच (BCCI) एका व्हिडिओतून दिलं आहे. बुमराहची गोलंदाजी वेगवान, अचूक आणि चेंडूला चांगली मूव्हमेंट देणारी असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. शिवाय त्याच्या चेंडूंवर फलंदाज गोंधळलेलेही दिसतात. या सामन्याचं कुठेही थेट प्रक्षेपण झालं नाही. पण, बीसीसीआयनेच दोन व्हिडिओ आतापर्यंत जारी केले आहेत. (India Tour of England)
(हेही वाचा – Israel Iran war : भारताकडून पराभूत झालेला पाकिस्तान इराणच्या मदतीला धावला ! इस्रायलला अणुहल्ल्याची धमकी …)
Intra-squad Game in Beckenham 📍
𝗣𝗿𝗲𝘀𝗲𝗻𝘁𝗶𝗻𝗴 𝗧𝗵𝗲 𝗣𝗲𝗿𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝗻𝗰𝗲 𝗔𝗻𝗮𝗹𝘆𝘀𝘁𝘀’ 𝗣. 𝗢. 𝗩
WATCH 🎥🔽 #TeamIndia | #ENGvINDhttps://t.co/IgKgF9SjmB
— BCCI (@BCCI) June 15, 2025
(हेही वाचा – Kundmala Bridge वर होते 200 ते 250 लोक; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम )
भारतीय संघ सध्या बेकेनहॅम (Beckenham) इथं आहे. हेडिंग्ले कसोटीपूर्वी भारतीय संघ इथं सराव करत आहे. या दरम्यान भारतीय संघ विरुद्ध भारतीय ए संघ असा एक चार दिवसीय सराव सामना इथं आयोजित करण्यात आला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सरावासाठी अशाप्रकारच्या सामन्याची मागणी केली होती. या सामन्याचं थेट प्रसारण होत नाहीए. पण, बीसीसीआयचे परफॉर्मन्स अनालिस्ट प्रसाद मोहन यांनी खेळाडूंच्या हालचाली आणि खेळ कॅमेरात टिपले आहेत. त्यांचा अभ्यास करून प्रशिक्षक वर्ग खेळाडूंना खेळण्याच्या पद्धतीवर सल्ले देणार आहेत. (India Tour of England)
त्यांनी केलेल्या चित्रिकरणात बुमराहला चांगली लय सापडल्याचं दिसत आहे. पाठदुखीनंतर बुमराह पाचही कसोटी खेळण्याची शक्यता मात्र कमीच आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community