-
ऋजुता लुकतुके
संजू सॅमसनची यंदाच्या टी-२० विश्वचषकातील कामगिरी ही प्रेरणादायी कहाण्यांपैकी एक मानली जाईल. प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळख असलेल्या सॅमसनला दीर्घ काळ सातत्य राखण्यात अडचणी येत होत्या. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याची कामगिरीही फारशी चांगली नव्हती आणि स्पर्धेच्या सुरुवातीला त्याला सर्व सामने खेळण्याची संधीही मिळाली नव्हती. मात्र एकदा संधी मिळाल्यानंतर त्याने दमदार पुनरागमन करत सलग तीन अर्धशतके झळकावली.(India T20 Champion)
सुपर-८ टप्प्यात वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू झालेली त्याची धडाकेबाज फलंदाजी अखेरपर्यंत कायम राहिली. या उत्कृष्ट कामगिरीमुळे सॅमसनला स्पर्धेतील “मालिकावीर” पुरस्कारही मिळाला.(India T20 Champion)
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटकने सॅमसनच्या या यशामागील आत्मविश्वासाचा खुलासा केला. त्यांच्या मते, सॅमसन नेहमीच सामन्यासाठी तयार होता. कोटक म्हणाले, “मी नेहमी सॅमसनला सांगायचो की कधीही एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होऊ शकतो, फॉर्मची समस्या येऊ शकते किंवा संघरचनेत बदल होऊ शकतो. त्यामुळे तू नेहमी तयार राहायला हवे.” यावर सॅमसन हसत म्हणायचा, “कोत्सी भाऊ, काळजी करू नका. संघाला जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा मी नक्की योगदान देईन.”(India T20 Champion)
(हेही वाचा – Anti Conversion Law : राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू होणार; विधानसभेत विधेयकावर होणार चर्चा )
कोटक यांनी एका मुलाखतीत सॅमसनला शतक करण्यास सांगितल्याचा किस्साही सांगितला. ते म्हणाले, “मी त्याला म्हटले, ‘एक शतक तरी कर.’ त्यावर सॅमसन हसत म्हणाला, ‘एका बाजूला तुम्ही म्हणता की वैयक्तिक मापदंड महत्त्वाचे नाहीत आणि दुसऱ्या बाजूला शतक करायला सांगता. हे दोन्ही कसे शक्य आहे?’”(India T20 Champion)
विशेष म्हणजे, २०२४ साली भारताने विश्वचषक जिंकला. पण, सॅमसनला संघात असूनही खेळायची संधी मिळाली नव्हती. मात्र २०२६ च्या स्पर्धेत त्याने पाच डावांत तब्बल ३२१ धावा केल्या आणि भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.(India T20 Champion)
यासोबतच त्याने विराट कोहलीचा २०१४ मधील टी-२० विश्वचषकातील ३१९ धावांचा विक्रमही मागे टाकला आणि एका टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला.(India T20 Champion)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

