भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा कर्णधार, न्यूझीलंड दौ-यासाठी यांच्यावर कर्णधारपदाची धुरा

112

टी-20 विश्वचषकानंतर होणा-या न्यूझीलंड आणि बांग्लादेश दौ-यासाठी भारतीय संघाची घोषणा भारतीय निवड समितीकडून करण्यात आली आहे. यामध्ये कर्णधारपदाच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. न्यूझीलंडमधील टी-20 मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे तर एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच भारताची टॉप ऑर्डर लोकेश राहु,विराट कोहली आणि रोहित शर्माला न्यूझीलंड दौ-यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणाला संधी

धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन हा देखील न्यूझीलंड दौ-यातून पुन्हा एकदा संघात प्रवेश करत आहे. मात्र त्याला बांग्लादेश दौ-यातून वगळण्यात आले आहे. पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज दीपक चहर हा देखील टीम इंडियाच्या बांग्लादेश दौ-यात सहभागी असणार आहे. मात्र अजूनही जसप्रीत बुमराहचे संघातील कमबॅक पुन्हा एकदा लांबणीवर गेले आहे. न्यूझीलंज विरुद्ध 18 ते 30 नोव्हेंबर दरम्यान तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. तर बांग्लादेश दौ-यात तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने भारतीय संघ खेळणार आहे.

न्यूझीलंड मालिकेसाठी टी-20 संघ

हार्दिक पांड्या(कर्णधार), ऋषभ पंत,शुभमन गिल,ईशान किशन,दीपक हूडा,सूर्यकुमार यादव,श्रेयस अय्यर,संजू सॅमसन,वॉशिंग्टन सुंदर,युजवेंद्र चहल,कुलदीप यादव,अर्शदीप सिंह,हर्षल पटेल,मोहम्मद सिराज,भुवनेश्वर कुमार,उमरान मलिक

न्यूझीलंड मालिकेसाठी एकदिवसीय संघ

शिखर धवन(कर्णधार),ऋषभ पंत,शुभमन गिल,दीपक हूडा,सूर्यकुमार यादव,श्रेयस अय्यर,संजू सॅमसन,वॉशिंग्टन सुंदर,शार्दुल ठाकूर,शाहबाज अहमद,युजवेंद्र चहल,कुलदीप यादव,अर्शदीप सिंह,दीपक चहर,कुलदीप सेन,उमरान मलिक

बांग्लादेश एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा(कर्णधार),के एल राहुल(उपकर्णधार),शिखर धवन,विराट कोहली,रजत पाटीदार,श्रेयस अय्यर,राहुल त्रिपाठी,ऋषभ पंत,ईशान किशन,रवींद्र जडेजा,अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर,शार्दुल ठाकूर,मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज,दीपक चहर,यश दयाल

बांग्लादेश कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा(कर्णधार),के एल राहुल(उपकर्णधार),शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा,विराट कोहली,श्रेयस अय्यर,ऋषभ पंत,के एस भरत(यष्टीरक्षक),आर. अश्विन,रवींद्र जडेजा,अक्षर पटेल,कुलदीप यादव,शार्दुल ठाकूर,मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज,उमेश यादव

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.