India A vs Sri Lanka A Final: अपमानाचा बदला जागतिक विक्रमाने! श्रीलंकेला वैभव सूर्यवंशीने दिवसा दाखवले तारे

India A vs Sri Lanka A Final: अपमानाचा बदला जागतिक विक्रमाने! श्रीलंकेला वैभव सूर्यवंशीने दिवसा दाखवले तारे

167
India A vs Sri Lanka A Final
India A vs Sri Lanka A Final

तिंरगा मालिकेच्या (India A vs Sri Lanka A Final) अंतिम सामन्यात इंडिया ए संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने श्रीलंका ए विरुद्धच्या सामन्याला केवळ अंतिम सामना न ठेवता बदल्याचा सामना बनवला. वैभवची बॅट अशी काही तळपली की, श्रीलंकन खेळाडू यापुढे “हा काय IPL नाही!” असे म्हणायला शंभर वेळा विचार करतील. वैभवने अवघ्या 29 चेंडूंमध्ये श्रीलंकन गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करत वैभवने केवळ जागतिक विक्रमच मोडीत काढला नाही, तर मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकून आपला शानदार प्रवास संपवला. (India A vs Sri Lanka A Final)

हेही वाचा-Pune Water Crisis: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, अन्यथा १० हजारांचा दंड!

तिंरगा मालिकेत यापूर्वी श्रीलंका ए विरुद्ध खेळलेल्या दोन सामन्यांत वैभवची कामगिरी फारशी विशेष झाली नव्हती. त्या दोन डावांत त्याला 35 धावा करता आल्या होत्या. दरम्यान, एका सामन्यात सुपर ओव्हरमध्ये वैभव क्रीझवर होता. जेव्हा तो सामना जिंकवून देऊ शकला नाही, तेव्हा श्रीलंकन खेळाडूंनी त्याच्यावर टोमणा मारत मोठ्या मिजाशीत म्हटले होते, “हा काय IPL नाही!” (India A vs Sri Lanka A Final)

हेही वाचा- Parbhani मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर

श्रीलंकन खेळाडूंच्या या वक्तव्यानंतर वैभव आणि त्यांच्यात मैदानातच वाद झाला होता. त्यावेळी इतर खेळाडूंनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, श्रीलंकन खेळाडूंचे ते शब्द वैभवच्या मनात सलत होते. अशातच जेव्हा अंतिम सामन्यात इंडिया ए आणि श्रीलंका ए पुन्हा आमनेसामने आले, तेव्हा वैभवला आपल्या अपमानाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आणि त्याने ती सोडली नाही. वैभव सूर्यवंशीने श्रीलंका ए विरुद्धच्या अंतिम सामन्यात अवघ्या 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. लिस्ट-ए क्रिकेटच्या (List-A Cricket) इतिहासातील हा नवा जागतिक विक्रम (World Record) ठरला आहे. (India A vs Sri Lanka A Final)

वैभवने आपल्या 29 चेंडूंच्या झंझावाती खेळीत 8 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने तब्बल 94 धावा ठोकल्या. अंतिम सामन्यात ठोकलेल्या 8 षटकारांच्या जोरावर वैभव सूर्यवंशी या मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने एकूण 11 षटकारांसह मालिकेचा शेवट केला. (India A vs Sri Lanka A Final)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.