
-
ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या बाद फेऱ्यांना सुरुवात झाली असताना भारताचा ए संघही इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. इंग्लंड लायन्सबरोबरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिलं जात आहे. कारण, ६ जूनला भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय ए संघाबरोबरच हा संघ सराव करणार आहे. सरावासाठी एक सामनाही खेळणार आहे. (India A vs England Lions)
३० मेला भारत ए आणि इंग्लंड लायन्स दरम्यानची पहिली अनधिकृत कसोटी सुरू होत आहे. कँटरबरी इथं सेंट लॉरेन्स मैदानावर हा कसोटी सामना होणार आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात यशस्वी जयस्वाल, शार्दूल ठाकूर, करुण नायर आणि ऋतुराज गायकवाड खेळणार आहेत. यातील तिघांचा समावेश भारताच्या राष्ट्रीय संघातही आहे. आणि या खेळाडूंसाठी मुख्य दौऱ्याआधीची ही सरावाची मोठी संधी असणार आहे. म्हणूनच भारतासाठी या मालिकेचं महत्त्व मोठं आहे. शिवाय या संघात ध्रुव जुरेलही आहे. त्याच्यावर उपकप्तानीची धुराही सोपवण्यात आली आहे. तो ही मुख्य संघात निव्वळ फलंदाज म्हणून खेळेल अशी शक्यता आहे. (India A vs England Lions)
(हेही वाचा – IPL 2025, RCB in Final : यजुवेंद्र चहल पहिल्या पात्रता सामन्यात का खेळला नाही?)
भारतीय ए संघ – अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, सर्फराझ खान, ऋतुराज गायकवाड, नितिश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर, मानव सुतार, तनुष कोटियन, ईशान किशन, मुकेश कुमार, आकाशदीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलिल अहमद, तुषार देशपांडे व हर्ष दुबे. (India A vs England Lions)
सामन्याचं ठिकाण – सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी
सामन्याची वेळ – स्थानिक वेळ ११ वा (भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता)
थेट प्रक्षेपण – ईसीबी वेबसाईट व ॲप
टीव्ही प्रसारण – उपलब्ध नाही
हेही पहा –
Join Our WhatsApp Community