India A vs England Lions : इंग्लंड लायन्स विरुद्ध सर्फराझ खानची दमदार फलंदाजी; ११३ चेंडूंत ९२ धावा

India A vs England Lions : राष्ट्रीय संघात सर्फराझला स्थान मिळालेलं नाही. 

65
India A vs England Lions : इंग्लंड लायन्स विरुद्ध सर्फराझ खानची दमदार फलंदाजी; ११३ चेंडूंत ९२ धावा
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा त्यात दोन निर्णय धक्कादायक होते. संघात चारच मधल्या फळीतील फलंदाज निवडून निवड समितीने अष्टपैलू आणि गोलंदाजांना झुकतं माप दिलं आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि सर्फराझ खान या दोन निव्वल फलंदाजांना संघात स्थान मिळालं नाही. श्रेयस अय्यर सध्या आयपीएलमध्ये चमकतोय. तर सर्फराझ खानने इंग्लंड लायन्सविरुद्ध आपला फॉर्म दाखवून दिला आहे. पहिल्याच दिवशी ११३ धावांत ९२ धावा करत त्याने करुण नायरबरोबर १८१ धावांची भागिदारीही रचली. (India A vs England Lions)

या दोघांमुळे भारतीय ए संघाने पहिल्या दिवशी ३ बाद ४०३ असा धावांचा डोंगर रचला आहे. सर्फराझ मागचे काही दिवस दुखापतीमुळे स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता. आयपीएलमध्येही त्याच्यावर बोली न लागल्यामुळे तो खेळला नाही. पण, अलीकडे सर्फराझने १० किलो वजनही कमी केलं आहे. आपली उपयुक्तता मैदानावर सिद्ध करण्यासाठी तो धडपडतोय. (India A vs England Lions)

(हेही वाचा – Delhi Government : ‘२७ वर्षात जे करता आले नाही, ते भाजपने १०० दिवसांत करून दाखवले’)

इंग्लंड लायन्स विरुद्ध २ बाद ५१ धावसंख्येवरून त्याची आणि करुण नायरची जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या सत्रात भराभर धावसंख्या वाढवली. सर्फराझने ११३ चेंडूंतील आपल्या खेळीत १३ चौकार लगावले आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. गेल्यावर्षी इंग्लंड विरुद्धच्या देशांतर्गत मालिकेतच सर्फराझने भारतीय संघात पदार्पण केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्याने आपलं पहिलं कसोटी शतकही साजरं केलं. पण, त्यानंतर आधी दुखापतीमुळे आणि नंतर तंदुरुस्ती म्हणजे स्थूलतेचा आरोप झाल्यामुळे निवड समितीचं त्याच्यावर लक्ष गेलेलं नाही. पण, या खेळीने त्याने आपला फॉर्म दाखवून दिला आहे. (India A vs England Lions)

भारतीय ए संघ इंग्लंड दौऱ्यात इंग्लंडच्या लायन्स संघाविरुद्ध दोन अनधिकृत सामने खेळणार आहे. दुसरा सामना ६ जूनपासून रंगणार आहे. (India A vs England Lions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.