-
ऋजुता लुकतुके
भारतासाठी इंग्लंड दौऱ्याची तयारी म्हणून भारत ए विरुद्ध इंग्लंड लायन्स सामन्याकडे पाहिलं जात आहे. अशा या महत्त्वाच्या सामन्यात कँटरबरी इथं भारतीय ए संघाने पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली आहे. ९० षटकांत ३ बाद ४०९ धावांची मजल मारताना भारताचे करुण नायर नाबाद १८६ तर ध्रुव जुरेल नाबाद ९२ धावांवर खेळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे करुण नायरने दमदार फलंदाजी करत विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या चौथ्या स्थानावर दावा ठोकला आहे. त्याच्या १८६ धावांमध्ये १ षटकार आणि २४ चौकार होते. (India A vs England Lions)
Finally, Karun Nair showcased his class in India A. What a century. Video courtesy – Jio Hotstar @JioHotstar#indvseng #Karunnair #gautamgambhir #JioHotstar pic.twitter.com/QaKIwqclQ4
— Shankar Singh (@Shanky_Parihar) May 30, 2025
इंग्लंड लायन्स संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पण, हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन यांचे चांगल्या सुरुवातीनंतर बळी गेले. भोजनापर्यंत भारताची अवस्था २ बाद ५२ अशी झाली होती. पण, हे एक सत्र सोडलं तर बाकी दोन्ही सत्रांवर भारतीय फलंदाजांनी राज्य केलं. दुसऱ्या एका सत्रात करुण नायर आणि सर्फराझ खान यांनी द्विशतक फलकावर लावलं. अखेर सर्फराझ ९२ धावांवर बाद झाला. पण, तोपर्यंत त्याने करुण नायरसोबत तब्बल १८१ धावांची भागिदारी केली. (India A vs England Lions)
(हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर शनिवारपासून 36 तासांचा Mega Block; 162 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना मोठा फटका)
HUNDRED FOR KARUN NAIR. 💯
Karun scored a Marvelous Hundred against England Lions, he made a brilliant comeback and this is a good sign for Indian Cricket.
– KARUN NAIR IS BACK..!!!! pic.twitter.com/FTSxxDS1M8
— Tanuj (@ImTanujSingh) May 30, 2025
करुण नायर यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो चौथ्या क्रमांकावर खेळतो. आणि अलीकडेच सुनील गावस्कर यांनी तो भारतासाठी या क्रमांकावर खेळू शकेल असं वक्तव्य केलं होतं. इंग्लंड लायन्सविरुद्ध १५५ चेंडूंत त्याने शतक पूर्ण केलं आणि त्यानंतर तिसऱ्या सत्रात खेळाचा वेगही वाढवला. त्याच्या साथीने सर्फराझचा खेळही बहरला. (India A vs England Lions)
Karun Nair had struck two fifties in his previous India A game six years ago. He returns with a firm hundred in only 155 balls. His 2nd century for India A, 5th FC century in 11 innings in 2025 and the 24th hundred of his First-Class career. #INDvENG pic.twitter.com/32CBpGrDiT
— Lalith Kalidas (@lal__kal) May 30, 2025
करुण नायरच्या तुलनेत सर्फराझ खान जलद गतीने धावा वाढवत होता आणि त्याने ९२ धावा केल्या त्या ११३ चेंडूंत. यात त्याने १३ चौकार लगावले. करुण नायर २०१७ नंतर भारताकडून शेवटची कसोटी खेळला आहे. त्यानंतर सात वर्षांनी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. जूनमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याचं संघातील स्थान पक्कं समजलं जात आहे. ही दावेदारी या खेळीने त्याने आणखी मजबूत केली आहे. (India A vs England Lions)
A HUNDRED BY KARUN NAIR.!!
– Karun completed 24th first class hundred with 159 balls with 14 fours he is making a statement with India A ahead of the England test series.!!🇮🇳 pic.twitter.com/tVU0Lt0eDx
— MANU. (@IMManu_18) May 30, 2025
कँटरबरीतील अनधिकृत कसोटीनंतर भारतीय ए संघ ६ जूनपासून दुसरी अनधिकृत कसोटी खेळणार आहे. त्यानंतर भारताचा मुख्य संघ आणि ए संघ यांच्यात एक सराव सामना होईल. २० जूनपासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना हेडिंग्ले इथं होणार आहे. (India A vs England Lions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community