India A vs England Lions : दुसऱ्या अनधिकृत कसोटीत भारतीय ए संघाला विजयाची संधी; भारताकडे १८४ धावांची आघाडी

India A vs England Lions : अभिमन्यू ईश्वरनने मोलाच्या ८४ धावा केल्या. 

48
India A vs England Lions : दुसऱ्या अनधिकृत कसोटीत भारतीय ए संघाला विजयाची संधी; भारताकडे १८४ धावांची आघाडी
  • ऋजुता लुकतुके

भारतीय ए संघाचाही सध्या इंग्लंड दौरा सुरू आहे. या दौऱ्यात भारतीय ए संघाला दुसऱ्या अनधिकृत कसोटीत विजयाची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या डावांत भारतीय संघाने २१ धावांची मामुली आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या डावांत भारतीय संघ ४ बाद १६४ धावांवर खेळत आहे. त्यामुळे भारताची एकूण आघाडी १८४ धावांची झाली आहे. भारताच्या दुसऱ्या डावांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे के. एल. राहुलने पुन्हा एकदा अर्धशतक झळकावलं आणि ५१ धावा केल्या. तर कर्णधार अभिमन्यू ईश्वरन फॉर्ममध्ये परतला. त्याने ९२ चेंडूंत ८० धावा केल्या. (India A vs England Lions)

(हेही वाचा – POP Ganesh Idol नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार)

करुण नायर मात्र १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि नितिश कुमार रेड्डी यांनी भारतीय डाव सावरला आहे. सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत. नॉर्दम्पटन इथं हा सामना सुरू असून या लढतीत भारतीय राष्ट्रीय संघातील ६ खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे या कसोटीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. (India A vs England Lions)

(हेही वाचा – ‘आपल्या देशात माणसांची किंमत नाही’; मुंबई लोकल दुर्घटनेवर Raj Thackeray संतापले )

आयपीएल संपल्यावर के. एल. राहुलही या कसोटीत खेळला आणि दोन्ही डावांत त्याची कामगिरी चांगली झाली. पहिल्या डावात त्याने शतक झळकावलं होतं आणि दुसऱ्या डावातही त्याने ५१ धावा केल्या. तर ध्रुव जुरेलही नियमित फलंदाज म्हणून मधल्या फळीत चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत त्याने दोन अर्धशतकं झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रिषभ पंतकडे यष्टीरक्षण आणि ध्रुव जुरेल निव्वळ फलंदाज म्हणून खेळेल अशी शक्यता आहे. नितिश कुमार रेड्डीने दोन्ही कसोटींत अष्टपैलू कामगिरी केली आहे. ३० ते ४० धावांसह त्याने नियमितपणे बळीही मिळवले आहेत. भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना येत्या २० जूनला हेडिंग्ले इथं होणार आहे. (India A vs England Lions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.