India A Team to England : अभिमन्यू ईश्वरन भारतीय अ संघाचा कर्णधार; ध्रुव जुरेल उपकर्णधार

India A Team to England : श्रेयस अय्यर अ संघात नाही.

45
India A Team to England : अभिमन्यू ईश्वरन भारतीय अ संघाचा कर्णधार; ध्रुव जुरेल उपकर्णधार
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आणि इंग्लंडचा प्रस्तावित मोठा दौरा यांच्यात ताळमेळ ठेवत अखेर निवड समितीने भारताच्या ए संघाची निवड जाहीर केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला कर्णधार बनवण्यात आले आहे, तर ध्रुव जुरेलला उपकर्णधार असेल. शुभमन गिल आणि साई सुदर्शन दुसऱ्या सामन्यापासून संघात सामील होतील, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. तोपर्यंत आयपीएल संपलेली असेल. (India A Team to England)

संघाला इंग्लंडमध्ये तीन सामने खेळायचे आहेत. यापैकी दोन सामने इंग्लंड लायन्सविरुद्ध असतील, तर तिसरा सामना भारतीय क्रिकेट संघासोबत खेळला जाईल. इंडिया अ संघाचा इंग्लंड लायन्स विरुद्धचा पहिला सामना ३० मे ते २ जून दरम्यान आणि दुसरा सामना ६ जून ते ९ जून दरम्यान खेळला जाईल. तर भारतीय वरिष्ठ संघाबरोबरचा सामना १३ ते १६ जून दरम्यान खेळला जाईल. (India A Team to England)

(हेही वाचा – Helicopter Crash : केदारनाथ धामला जाणारे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा क्रॅश !)

वरिष्ठ संघाला २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळला जाईल. हा दौरा ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. या संघात करुण नायर, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन अशी मोठी नावे आहेत. तनुष कोटियन, आकाश दीप यांचाही समावेश आहे. शार्दुल ठाकूर वरिष्ठ संघाचा भाग होईल हे निश्चित मानले जाते. या संघात अनेक वरिष्ठ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये सलामीवीर यशस्वी जयस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर या नावांचा समावेश आहे. (India A Team to England)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ :

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार, यष्टिरक्षक) नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित अहमद, हर्षित कमान, गौतम कुमार, आकाश दीप, गौतम ऋषी, अनिल राणा, सरफराज खान, तुषार देशपांडे आणि हर्ष दुबे. (India A Team to England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.