Ind W vs Eng W : भारतीय महिला क्रिकेट संघाचा कसोटीत इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक विजय

भारतीय महिलांनी एकमेव कसोटी सामन्यांत इंग्लिश संघाचा ३४७ धावांनी पराभव केला.

220
Ind W vs Eng W : भारतीय महिला क्रिकेट संघाचा कसोटीत इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक विजय
Ind W vs Eng W : भारतीय महिला क्रिकेट संघाचा कसोटीत इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक विजय
  • ऋजुता लुकतुके

भारतीय महिलांनी एकमेव कसोटी सामन्यांत इंग्लिश संघाचा ३४७ धावांनी पराभव केला. (Ind W vs Eng W)

भारत आणि इंग्लिश महिला संघाचा कसोटी क्रिकेट सामना भारतासाठी ऐतिहासिक असाच ठरलाय. या सामन्यांत ३४७ धावांनी विजय मिळवून भारतीय महिलांनी २०१४ नंतरचा आपला पहिला कसोटी विजय नोंदवला. भारताने महिला क्रिकेटमध्ये फक्त दुसऱ्यांदा तर एकाच दिवसांत पहिल्यांदा ४०० धावांचा टप्पा ओलांडला. आणि त्याचबरोबर महिलांच्या क्रिकेटमधील सर्वाधिक मोठ्या फरकाने कसोटी जिंकण्याचा विक्रमही आता महिला संघाच्या नावावर लागलाय. (Ind W vs Eng W)

मुंबईत झालेल्या या कसोटी सामन्यात तीनही दिवस भारताचं वर्चस्व होतं. पहिली फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ४२८ अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर इंग्लिश संघाचा पहिला डाव त्यांनी दीडशेच्या आत गुंडाळला. आणि दुसऱ्या डावात १८९ धावांची समाधानकारक धावसंख्या उभारून त्यांनी इंग्लिश महिलांसमोर ४७९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण, कसोटीच्या चौथ्या दिवशी त्यांचा डाव १३१ धावांत संपुष्टात आला. (Ind W vs Eng W)

पहिल्या डावात भारताकडून ४ महिलांनी अर्धशतकं केली. तर दीप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी करताना पहिल्या डावात ५ इंग्लिश महिलांना तंबूत पाठवली. त्यासाठी ५.३ षटकांत तिने ७ धावा दिल्या. दुसऱ्या डावातही दीप्तीचीच गोलंदाजी प्रभावी ठरली. आणि तिने ८ षटकांत ३२ धावा देत ४ बळी मिळवले. त्यामुळे दोन डावांत मिळून ८७ धावा आणि ९ बळी या कामगिरीसाठी दीप्ती शर्मालाच कसोटीवीर पुरस्कार मिळाला. (Ind W vs Eng W)

भारतीय ड्रेसिंग रुममध्येही दीप्तीचं कौतुक करण्यात आलं. तसंच विजयाचा जल्लोष साजरा झाला. (Ind W vs Eng W)

(हेही वाचा – Mission Lakshyavedh : खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार- संजय बनसोडे)

भारतीय संघाने यापूर्वी २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात इंग्लिश महिलांना दोनदा हरवलं होतं. पण, मायदेशात मागच्या १५ कसोटींत त्यांना विजय मिळवता आला नव्हता. शिवाय मायदेशात ९ वर्षांनंतर कसोटी खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने हा विजय मिळवून पाठिराख्यांना आनंद दिला आहे. (Ind W vs Eng W)

विशेष म्हणजे महिला क्रिकेटमधील सगळ्यात मोठा विजयाचा विक्रम आता भारतीय महिलांच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वीचा सगळ्यात मोठा कसोटी विजय होता तो श्रीलंकेनं पाकिस्तान विरुद्ध ३०९ धावांनी मिळवलेला विजय. तो ही १९९८ मध्ये मिळवलेला. पण, आता भारताने हा विक्रम मोडला आहे. (Ind W vs Eng W)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.