IND vs WI T20 : भारतासाठी करो या मरो सामन्यात तरी यशस्वी जयस्वालला खेळवणार का?

मालिकेत ०-२ ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो असाच आहे.

134
ICC Test Ranking : यशस्वी जयस्वाल आयसीसी क्रमवारीत पहिल्यांदाच पहिल्या दहांत

ऋजुता लुकतुके

विंडिजबरोबरच्या पाच टी-२० (IND vs WI T20) सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर आहे. आजचा (मंगळवार, ८ ऑगस्ट) सामनाही गमावला तर २०१६ नंतर पहिल्यांदाच विंडिज संघाविरोधात मालिका गमावण्याची नामुष्की संघावर ओढवले. पहिले दोन टी-२० सामने आणि एकदिवसीय मालिका (भारताने कशी बशी २-१ने जिंकली) पाहता फलंदाजांची मधली फळी आणि तेज गोलंदाजांचा तोफखाना भारतासाठी कमी पडलाय.

असं असताना काही महत्त्वाचे बदल आता तरी भारतीय संघ प्रशासन करणार का हा प्रश्न आहे. पाहूया भारतीय संघासमोरचे उपलब्ध खेळाडूंचे पर्याय,

ईशान किशनच्या जागी यशस्वी जयस्वाल

ईशान किशनचा (IND vs WI T20) फॉर्म सलामीवीर आणि यष्टीरक्षक म्हणूनही चांगला नाहीए. दुसरा टी-२० सामना वगळला तर दुहेरी आकडा गाठणंही त्याला कठीण जातंय. अशावेळी संघाचा दरवाजा ठोठावत असलेल्या यशस्वी जयस्वालला आता तरी संधी मिळेल का हे पाहावं लागेल.

यशस्वी (IND vs WI T20) यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी करूनच संघात आलाय. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १४ सामन्यांत त्याने ६२५ धावा फटकावल्या त्या १६३ च्या स्ट्राईक रेटने. त्यानंतर विंडिज दौऱ्यावर त्याला कसोटी संघात स्थान मिळालं. तिथेही त्याने संधीचं सोनं करताना पदार्पणातच शकत झळकावलं. आता टी-२० सामन्यातील संधीची तो वाट बघतोय.

संजू सॅमसन यष्टीरक्षण करेल?

यशस्वीला ईशानच्या (IND vs WI T20) जागी खेळवायचं झालं तर संजू सॅमसन यष्टीरक्षण करू शकेल. संजू तडाखेबंद फलंदाज असल्यामुळे आधीच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरला असला तरी टी-२० साठी उपयुक्त आहे. आणि यष्टीरक्षणाची जबाबदारीही तो पार पाडू शकतो.

अर्थात, आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी संजू सॅमसनकडे आता पुरेशा संधी नाहीत. त्यामुळे आता नाहीतर कधीच नाही, या आवेशाने त्याला खेळावं लागेल.

कुलदीप यादवला संधी

चायनामन कुलदीप यादवचा (IND vs WI T20) भारतीय संघात समावेश आहे. पण, अंगठ्याच्या दुखापतीमुळे तो पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता. त्यामुळे भारतीय फिरकीची बाजूही लुळी पडली. यजुवेंद्र चहलला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.

(हेही वाचा – Rain : मुंबईत पुढील दहा-बारा दिवस मुसळधार पावसाची शक्यता धूसर)

नवोदीत रवी बिश्नोई कमी पडला. पण, आता कुलदीप दुखापतीतून सावरला असेल तर भारतीय संघासाठी ती चांगली बातमी असेल. खासकरून विंडिजमधली खेळपट्ट्या धिम्या आहेत आणि इथं १५० च्या आसपास धावा एका डावात होत आहेत.

अशावेळी फिरकीतली विविधता भारतीय संघाला नक्कीच उपयोगी पडेल.

मुकेश कुमारच्या जागी अवेश

मुकेश कुमारने या मालिकेत धावा अक्षरशः लुटल्या आहेत. खासकरून दुसऱ्या टी-२० (IND vs WI T20) मध्ये मोक्याच्या क्षणी त्याच्या षटकात तळाच्या विंडिज फलंदाजाने षटकार मारला, आणि तो सामना भारताच्या विरोधात फिरला.

ही गोष्ट कर्णधार हार्दिक पांड्या विसरला नसणार. कारण, सामन्यानंतर चुकीच्या वेळेवर मुकेश कुमारला गोलंदाजीसाठी आणल्याचं खापर त्याच्यात माथी फुटलं. अशावेळी उमरान मलिक किंवा अवेश खानचा विचार तिसरा तेज गोलंदाज म्हणून नक्की होऊ शकतो. उमरान मलिकने एकदिवसीय मालिकेत आपली छाप पाडली नाही. तो पुरेसा वेगवान किंवा भेदकही नव्हता.

त्यामुळे आयपीएलमध्ये यशस्वी ठरलेल्या अवेश खानचा (IND vs WI T20) विचार नक्कीच होऊ शकतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.