Ind vs SA : भारतीय मुकाबल्यासाठी सज्ज असल्याचा टेंबा बवुमाचा इशारा

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे यंदाच्या विश्वचषकातील दोन मोठे संघ आहेत. त्यामुळे रविवारी हे संघ आमने सामने येतील ती लढत आतापर्यंतची लक्षवेधी लढत असेल आणि या सामन्यासाठी तयार असल्याचा इशारा आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमाने दिलाय.

59
Ind vs SA : भारतीय मुकाबल्यासाठी सज्ज असल्याचा टेंबा बवुमाचा इशारा
Ind vs SA : भारतीय मुकाबल्यासाठी सज्ज असल्याचा टेंबा बवुमाचा इशारा
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे यंदाच्या विश्वचषकातील दोन मोठे संघ आहेत. त्यामुळे रविवारी हे संघ आमने सामने येतील ती लढत आतापर्यंतची लक्षवेधी लढत असेल आणि या सामन्यासाठी तयार असल्याचा इशारा आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमाने दिलाय. (Ind vs SA)

या विश्वचषकात आता सगळ्यांचं लक्ष रविवारी ईडन गार्डन मैदानावर होणाऱ्या भारत वि दक्षिण आफ्रिका या सामन्याकडे लागलेलं असेल. एकीकडे भारतीय संघ सलग सात विजय मिळवून कोलकात्यात दाखल होईल. तर दुसरीकडे या स्पर्धेतील तीन मोठे विजय मिळवलेला आफ्रिकन संघ तिथे त्यांची वाट बघत असेल. (Ind vs SA)

आफ्रिकन संघाला नेदरलँड्सने त्यांच्या तिसऱ्या साखळी सामन्यात दणका देण्यापूर्वी आणि त्यानंतर आफ्रिकन संघाने एकही चूक केली नाहीए. उलट त्या दणक्यानंतर काहीतरी करून दाखवण्याच्या ईर्ष्येनं हा संघ आणखी आक्रमक खेळतोय. नुकताच न्यूझीलंड विरुद्ध त्यांनी १९० धावांनी विजय मिळवलाय. (Ind vs SA)

त्यामुळे हा सामना लक्षवेधी होणार हे तर नक्की आहे. अशावेळी आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमाने भारतीय आव्हानासाठी आपला संघ तयार आहे आणि भारतात भारताला हरवण्याची कामगिरी आपण पूर्वी केलेली आहे, असं म्हणत वाक् युद्धाला सुरुवात केली आहे. (Ind vs SA)

‘भारतीय संघाशी भारतात भिडणं हीच एक मोठी इव्हेंट आहे. त्यातच विश्वचषकासारख्या इव्हेंटमध्ये आम्हाला ते करायचंय. म्हणजे आव्हान मोठं आहे. पण, आम्ही त्यांच्याशी पूर्वी भारतात खेळलोय आणि जिंकूनही दाखवलंय,’ असं न्यूझीलंड बरोबरच्या सामन्यानंतर बवुमाने बोलून दाखवलं आहे. (Ind vs SA)

तर संघातील आणखी एक फलंदाज व्हॅन देअर ड्युसेननेही संघावर विश्वास व्यक्त केला. (Ind vs SA)

‘आमच्यावर दडपण असणार आणि दडपण बाळगत आम्ही आम्हाला जे करायचंय ते करू शकलो, तर सामना जिंकण्याची ताकद आमच्याकडे नक्कीच आहे.’ (Ind vs SA)

(हेही वाचा – Mahad Fire News : महाडच्या जेट इन्सुलेशन हेल्थकेअर कंपनीत स्फोट, पाच जण जखमी)

थोडक्यात, भारताविरुद्ध खेळायला आपण तयार आहोत, असं आफ्रिकन संघाला सांगायचं आहे. (Ind vs SA)

आफ्रिकन संघ या स्पर्धेत खरंच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेतल्या पहिल्या पाच सर्वात मोठ्या धावसंख्येपैकी ३ या संघाच्या आहेत. त्यांचा प्रमुख फलंदाज क्विंटन डी कॉक ५५४ धावांसह स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी फलंदाज आहे. या विश्वचषकात आफ्रिकन संघाने सगळ्यात कमी डॉट बॉल दिले आहेत. तर सर्वाधिक षटकार आणि चौकारही संघाच्या नावावर आहेत. त्यामुळे आफ्रिकन संघ या स्पर्धेतील ‘टीम-टू-बिट’ असा संघ आहे. (Ind vs SA)

आफ्रिकन संघ १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला तेव्हापासून विश्वचषकातील सगळ्यात सातत्यपूर्ण संघ राहिला आहे. पण, आयसीसीच्या सगळ्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये त्यांच्यावर ‘चोकर’चा शिक्काही बसला आहे. कारण, निर्णायक सामन्यामध्ये संघाचे शिस्तबद्ध असलेले खेळाडू चांगली कामगिरी करू शकत नाहीत. आणि या स्वभावामुळे संघाला आयसीसीची एकही महत्त्वाची स्पर्धा आतापर्यंत जिंकता आलेली नाही. (Ind vs SA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.