Ind vs SA ODI Series : भारतीय संघ एकदिवसीय मालिकेची अशी करतोय तयारी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना १७ डिसेंबरला जोहानसबर्ग इथं होणार आहे. 

136
Ind vs SA 1st ODI : रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची विश्वचषकानंतर नवीन सुरुवात
Ind vs SA 1st ODI : रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची विश्वचषकानंतर नवीन सुरुवात
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना १७ डिसेंबरला जोहानसबर्ग इथं होणार आहे. (Ind vs SA ODI Series)

दक्षिण आफ्रिकेबरोबरची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर या दौऱ्यातील पुढचा टप्पा आहे तो एकदिवसीय मालिकेचा. पहिला एकदिवसीय सामना रविवारी १९ तारखेला जोहानसबर्ग इथं होणार आहे आणि भारताचा एकदिवसीय संघ शुक्रवारीच इथं दाखल झाला आहे. एकदिवसीय संघाचं नेतृत्व के एल राहुल करत आहे. (Ind vs SA ODI Series)

शुक्रवारी संध्याकाळी भारतीय संघाचं पहिलं सराव सत्रही पार पडलं. बीसीसीआयने याचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या सत्रात अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल हे फिरकी गोलंदाज तसंच अर्शदीप सिंग हा तेज गोलंदाज कर्णधार के एल राहुलला गोलंदाजी करताना दिसत आहेत. (Ind vs SA ODI Series)

‘आमचा एकदिवसीय संघ दक्षिण आफ्रिकेत येऊन पोहोचला आहे आणि तयारी सुरू झाली आहे,’ असं बीसीसीआयने या व्हिडिओत म्हटलं आहे. (Ind vs SA ODI Series)

(हेही वाचा – Impact Fielder in the Team : मोहम्मद सिराज संघातील प्रभावशाली क्षेत्ररक्षक)

शुभमन गिलला विश्रांती

भारताच्या एकदिवसीय संघाचं नेतृत्व के एल राहुल करणार आहे आणि त्याच्या बरोबरच श्रेयस अय्यरही भारतीय संघात परतला आहे. पण, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा हे ज्येष्ठ खेळाडू एकदिवसीय मालिका खेळणार नाहीएत. हे तिघे कसोटी संघातच परततील. त्यांच्या अनुपस्थितीत संघाची मदार असेल ती रिंकू सिंग, साई सुदर्शन, संजू सॅमसन आणि रजत पाटिदार यांच्यावर. शुभमन गिललाही एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. (Ind vs SA ODI Series)

पहिला एकदिवसीय सामना १७ तारखेला झाल्यानंतर दुसरा सामना १९ डिसेंबरला तर तिसरा २१ डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर २६ डिसेंबरला सेंच्युरियन इथं बॉक्सिंग डे कसोटी सामन्याने कसोटी मालिकेला सुरुवात होईल. (Ind vs SA ODI Series)

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ :

के एल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटिदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान व अर्शदीप सिंग. (Ind vs SA ODI Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.