Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटी आधी भारतीय चाहत्यांना रोहित शर्माने काय वचन दिलं?

पहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने चाहत्यांना खेळ उंचावण्याचं वचन दिलं आहे. 

168
IPL 2024 Mumbai Indians : यंदाच्या आयपीएल नंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?
  • ऋजुता लुकतुके

पहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने चाहत्यांना खेळ उंचावण्याचं वचन दिलं आहे. (Ind vs SA 2nd Test)

भारतीय क्रिकेट संघाला दुसऱ्या कसोटीपूर्वी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी सुटी मिळणार आहे. पण, संघात सध्या वातावरण आहे ते पहिल्या कसोटीत झालेल्या मोठ्या पराभवाचं. कर्णधार रोहित शर्माला मात्र हा पराभव मागे टाकून पुढील कसोटीत चांगली कामगिरी करण्याचे वेध लागले आहेत. खेळाडूंच्या वतीने त्याने चाहत्यांना तसं वचनही दिलं आहे. (Ind vs SA 2nd Test)

‘माझा संघ जोरदार पुनरागमन करेल,’ असं तो गरजला आहे. (Ind vs SA 2nd Test)

भारतीय संघ या मालिकेच्या सुरुवातीला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल होता आणि संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात होती. कारण, क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने आजतागायत फक्त दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही. ती जिंकण्याची संधी या भारतीय संघाला आहे, असं चाहत्यांना वाटत होतं. त्यामुळेच दोन कसोटींची ही मालिका ‘द फायनल फ्रंटिअर’ म्हणून पाहिली जात होती. प्रसारक कंपन्यांनीही तशीच जाहिरात केली होती. (Ind vs SA 2nd Test)

पण, आता आफ्रिकन संघाने मालिकेत आघाडी घेतल्यामुळे भारताला इथं मालिका काही जिंकता येणार नाही. फार तर फार १-१ अशी बरोबरी साधता येईल. (Ind vs SA 2nd Test)

(हेही वाचा – BAPS Hindu Mandir: अबुधाबीमध्ये पहिले भव्य हिंदू मंदिर उभारणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले उद्घाटनाचे निमंत्रण)

राहुल आणि विराट सोडले तर कुणीही खेळपट्टीवर टिकून राहिलं नाही – रोहित 

‘प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही चांगला खेळ केला नाही. पहिल्या डावात २४५ ही काही वाईट धावसंख्या नव्हती. पण, दुसऱ्या डावात पुन्हा आम्ही ढेपाळलो. राहुल आणि विराट सोडले तर कुणीही खेळपट्टीवर टिकून राहिलं नाही. आणि गोलंदाजांनी तर साफ निराशा केली,’ सामना संपल्यानंतर रोहित पत्रकारांशी बोलताना म्हणाला. (Ind vs SA 2nd Test)

३ दिवसांत कसोटी हरल्यावर सांगण्यासारखं काही उरत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. पण, तेवढ्यात त्याने संघाकडे असलेल्या क्षमतेवरही विश्वास दाखवला. (Ind vs SA 2nd Test)

‘आमच्यातील काही खेळाडू पहिल्यांदाच इथल्या वातावरणात खेळत होते. आता काही दिवस सुटीचे आहेत. त्या दिवसांत जितक्या लवकर आम्ही पुन्हा एकत्र येऊ आणि सांघिक भावनेनं खेळू तितकं आम्हाला हवं आहे. आम्ही नक्की पुन्हा एकत्र येऊ आणि मालिकेत पुनरागमनही करू,’ असं रोहित ठासून म्हणाला. (Ind vs SA 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.