Ind vs Pak World Cup 2023 : ‘भारताविरोधात 5 विकेट घेणार’; सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीला वाटतोय विश्वास

161
Ind vs Pak World Cup 2023 : ‘भारताविरोधात 5 विकेट घेणार’; सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीला वाटतोय विश्वास

शनिवार १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता विश्वचषकातील बहुचर्चित (Ind vs Pak World Cup 2023) सामना रंगणार आहे. अहमदाबाच्या नरेंद्र मोदी मैदानावर भारत पाकिस्तान हे भिडणार आहेत. या सामन्याची प्रचंड उत्सुकता क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच मॅचच्या आधी पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने एक विधान केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा होत आहे.

शाहीन आफ्रिदी हा पहिल्यांदाच (Ind vs Pak World Cup 2023) भारतात खेळण्यासाठी आला आहे. शाहीन आफ्रिदीने भारताविरुद्धच्या सामन्यात आपण पाच विकेट घेणार असल्याचे सांगितले आहे. असे विधान करून त्याने एकप्रकारे भारतीय संघाला आव्हानच दिले आहे. शाहीन आफ्रदी याने आतापर्यंत 46 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने दोनदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे शाहीन आफ्रिदी अहमदाबादच्या खेळपट्टीवर भारताविरोधात नव्या चेंडूचा वापर कसा करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Ind vs Pak World Cup 2023)

(हेही वाचा – World Cup 2023 : तिकीट विक्री गोंधळाचा वाद न्यायालयात, भारताच्या मॅचसाठी बीसीसीआयने पाहा काय केले)

विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानचे गोलंदाज (Ind vs Pak World Cup 2023) अपयशी ठरले आहेत. हसन अली याने भेदक मारा केला. पण शाहीन फ्लॉपच गेला. शाहीनला दोन्ही सामन्यात फक्त 1-1 विकेट मिळाली. मात्र नव्या चेंडूने तो भारताविरुद्ध प्रभावी ठरु शकतो अशी त्याला खात्री आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.