Ind vs Pak Review : भारत-पाक सामन्याचं दडपण पेलेल, तोच संघ जिंकेल

क्रिकेटमध्ये भारत-पाक सामना हा सामान्य नसतोच. दोन्ही संघांसाठी तो अंतिम लढतीपेक्षा कदाचित महत्त्वाचा असतो.

27
Ind vs Pak Review : भारत-पाक सामन्याचं दडपण पेलेल, तोच संघ जिंकेल
Ind vs Pak Review : भारत-पाक सामन्याचं दडपण पेलेल, तोच संघ जिंकेल
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेटमध्ये भारत-पाक सामना हा सामान्य नसतोच. दोन्ही संघांसाठी तो अंतिम लढतीपेक्षा कदाचित महत्त्वाचा असतो. हे अवती भवतीचं दडपण जो संघ चांगला हाताळतो, आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करतो, तो जिंकतो.

भारत – WWLWW

पाकिस्तान – WWLWW

पाकिस्तानकडून शेवटच्या सामन्यात रिझवानच्या १३१ धावा तर सलामीवीर शफिकचेही शतक. एकूण २ सामन्यांत २ शतकं. तर भारतासाठी शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहीत शर्माच्याही १३१ धावा आणि त्या आधीच्या सामन्यात के एल राहुलची नाबाद ९७ धावांची खेळी. (Ind vs Pak Review)

त्या सुरुवातीला दिलंय ते शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यातील निकाल. थोडक्यात काय शनिवारी अहमदाबादला दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा सध्याच्या फॉर्मचं पारडं समसमान असेल. फरक असेल तो सामन्याच्या वातावरणात. कारण, फक्त अहमदाबादमध्येच नाही तर अख्ख्या भारतात या सामन्याचंच भारावलेपण असेल. देशातलं सगळ्यात मोठं क्रिकेट मैदान ज्याती क्षमता १,३२,००० प्रेक्षकांची आहे, हाऊसफुल्ल असेल. आणि यातले काही असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, कदाचित संरक्षणमंत्री राजनाथ सिंगही. आणि बिग बी अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्यासह शाहरुख खान आणि आमीर खानही. (Ind vs Pak Review)

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जो होऊ शकला नाही, तो या सामन्यापूर्वी होणार आहे. म्हणजे अधिकृत उद्घाटन सोहळा नाही. पण, सांगीतिक एक कार्यक्रम बीसीसीआयने या सामन्यापूर्वी ठेवलाय. म्हणजे प्रत्यक्ष सामन्यापूर्वी खेळाडूंना तयारीसाठी जो वेळ लागतो, तो इथं मिळणार नाहीए. पण, भारत-पाक सामन्यात तो तसाही कधी मिळतो? उलट स्पर्धा सुरू झाली की फक्त याच सामन्याची चर्चा असते. सचिन तेंडुलकर एकदा म्हणाला होता की, विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेला पोहोचल्यापासून तो फक्त आणि फक्त सेंच्युरिअन या एकाच गोष्टीचा विचार करत होता. कारण, त्याने विसरण्याचा प्रयत्न केला तरी भोवतालचे लोक त्या एकाच सामन्याबद्दल बोलायचे. अर्थात, सेंच्युरिअनला भारत-पाक सामना होता. (Ind vs Pak Review)

सांगण्याचा मुद्दा काय तर एरवी संघ कितीही तुल्यबळ वाटतील, किंवा कुणाला एखादा संघ सरसही वाटेल. पण, भोवतालचं वातावरण जेव्हा असं सामन्याने भारावलेलं असतं तेव्हा हे भारावलेपण सकारात्मक ऊर्जेनं भरून टाकेल तो संघच विजयी होतो. शनिवारी ज्या संघाचे खेळाडू हे दडपण झटपट स्वीकारून खऱ्या क्रिकेटसाठी तयार होतील त्या संघाला जास्त संधी असेल. (Ind vs Pak Review)

‘शुभमन ९९% उपलब्ध’

शुभमन गिल सामन्यासाठी ९९ टक्के उपलब्ध आहे असं सांगून भारतीय कर्णधार रोहीत शर्माने सगळ्यांनाच खुश केलं आहे. गिल भारतीय संघाच्या आधी अहमदाबादला पोहोचला होता. त्याने एक दिवस आधी सराव सुरू केला आणि सरावादरम्यान चांगली प्रगतीही दाखवली. ते डेंग्यूतून पूर्णपणे सावरेला दिसला. (Ind vs Pak Review)

आता तो संघ निवडीसाठी उपलब्ध आहे, असं रोहीत स्वत: म्हणतोय. म्हणजेच भारतीय संघ व्यवस्थापन आपला प्रथम पसंतीचे अकरा खेळाडू या सामन्यात खेळवू शकेल. ही मोठी जमेची बाजू असेल. आणि उरलेल्या १ टक्क्यावरून निर्णय घ्यावा लागला तरी ईशान किशनच संघाची पसंती असेल. त्यानेही आशिया चषकात पाक विरुद्ध ८२ धावा करून आपला फॉर्म दाखवून दिला आहे. (Ind vs Pak Review)

शुभमन विषयीचा निर्णय झाल्यानंतर संघाला आणखी एक निर्णय घ्यायचा आहे तो गोलंदाजांचा. कारण, या स्टेडिअमवर नुतनीकरणानंतर मागची ३ वर्षं फिरकी गोलंदाजांपेक्षा तेज गोलंदाजांची कामगिरी उजवी आहे. कर्णधारांनी षटकं देतानाही तेज गोलंदाज जास्त वापरलेत. त्यामुळे अष्टपैलू जाडेजा आणि कुलदीप सोडला तर शार्दूलचा संघात समावेश नक्की वाटतोय. किंवा अशा खेळपट्टीवर शामीही प्रभावी ठरू शकतो. (Ind vs Pak Review)

(हेही वाचा – BMC Hospital : महापालिकेच्या सर्व रुग्णलयांमधील उपकरणे आणि यंत्रांच्या देखभालीवर वर्षाला २० कोटींचा खर्च)

महम्मद शफीक वि. जसप्रीत बुमरा

एरवी ही लढत भारतीय फलंदाज विरुद्ध पाक तेज गोलंदाज अशी भासली असती. पण, अलीकडचा फॉर्म बघता, अब्दुल्ला शफीक विरुद्ध जसप्रीत बुमरा अशी एक उपलढत तयार झाली आहे. जसप्रीतने अफगाणिस्तान विरुद्ध ३९ धावांमध्ये ४ बळी टिपले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धही त्याची सुरुवात चांगली होती. तो भारताचा सध्याचा अचूक आणि यशस्वी गोलंदाज आहे. शिवाय मोटेरा हे त्याचं घरचं मैदान आहे. (Ind vs Pak Review)

आणि दुसरीकडे पाकचा सलामीवीर अब्दुल्ला शफीक श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात चमकला आहे. पदार्पणातच शतक ठोकून त्याने आपली जिगर दाखवून दिली आहे. आता भारताविरुद्धच्या आव्हानासाठी तो तयार आहे. तर शाहीन आफ्रिदीचा डावखुरा मारा खेळण्यासाठी भारतीय फलंदाजांना विशेष तयारी करावी लागणार आहे. खासकरून रोहीत शर्मा १३ सामन्यांमध्ये ५ वेळा डावखुऱ्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर उद्या शाहीन आफ्रिदीची कसोटी असणार आहे. (Ind vs Pak Review)

नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी काळ्या मातीची बनलेली आहे. ती बऱ्यापैकी टणक आहे आणि वातावरणही हलक्या पावसाचा अंदाज सोडला तर उष्ण आणि कोरडं आहे. रात्री मात्र दवाचा थोडा त्रास होऊ शकतो. हे पाहता, पहिली बॅटिंग करणारा संघ इथं धावांचं सोनं लुटण्याचाच प्रयत्न करले. इथं आधी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने तेच केलं होतं. आता भारत आणि पाकिस्तानला ती संधी आहे. (Ind vs Pak Review)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.