पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर ‘विराट’ला आठवला ‘धोनी’, म्हणाला…

83

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. परंतु तरीही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने केलेल्या एका विधानामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे. या पत्रकार परिषदेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत बोलताना, विराट म्हणाला की, मी कसोटी सामन्यातील कर्णधारपद सोडल्यानंतर माजी कर्णधार एम.एस. धोनी हा एकमेव अशी व्यक्ती आहे, ज्याने मला मेसेज केला होता, असे विराट म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर मागील वर्षी विराटने कसोटीचे कर्णधारपद सोडले होते. मागच्या काही काळापासून विराट दमदार खेळी खेळण्यात अयशस्वी ठरल्याने, एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरुनही त्याला काढण्यात आले होते.

( हेही वाचा: उद्योगक्षेत्रात लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या संभाळणारे सायरस मिस्त्री कोण होते? )

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने धोनीचा उल्लेख केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने चांगली खेळी केल्याने त्याला लय गवसल्याची चर्चा सोशल मीडियावर असून, याच चर्चेच्या माध्यमातून विराटला बॅड पॅचमधील अनुभवांबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना विराटने म्हटले की, मी कसोटी क्रिकेटचे कर्णधार पद सोडल्यानंतर, धोनीने मला मेसेज केला होता. दोघांमधील खास नात्याबद्दल बोलताना, विराटने हे विधान केले. मी अनेक खेळाडूंसोबत खेळलो आहे. अनेकांकडे माझा नंबर आहे परंतु केवळ धोनीनेच मला मेसेज करुन माझी चौकशी केल्याचे, विराटने सांगितले. जेव्हा मला गरज असते तेव्हा मी खासगी स्तरावर धोनीशी संपर्क साधतो, असे विराट म्हणाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.