IND Vs IRE : ऋतुराजचे अर्धशतक, रिंकू सिंहची आक्रमक खेळीने भारताची 185 धावांपर्यंत मजल

112

ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक आणि शिवम-रिंकू यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाड याने 58 धावांची खेळी केली. संजू सॅमसन याने 40 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंह याने झटपट 38 धावांचे योगदान दिले. आयर्लंडपुढे विजयासाठी 186 धावांचे आव्हान आहे.

रिंकू-शिवमची दमदार खेळी 

आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रिंकू सिंह याने 21 चेंडूत 38 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. तर शिवम दुबे याने 16 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने नाबाद 22 धावा जोडल्या. मोक्याच्या क्षणी रिंकू आणि शिवम यांनी वेगाने धावा केल्या.

(हेही वाचा Western Expressway : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास यंदा खड्ड्याविना)

रिंकू-शिवमची आक्रमक खेळी 

युवा रिंकू सिंह आणि शिवम मावी यांनी भारताला जबरदस्त फिनिशिंग दिली. अखेरच्या काही षटकार या जोडीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारताची धावसंक्या 180 च्या पार पोहचवली. रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी अवघ्या 28 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. यामध्ये रिंकूने 12 चेंडूत 28 चक शिवम याने 16 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले.

ऋतुराज-संजूने डाव सावरला

यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा लागोपाठ तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ऋतुराज गायकवाड याने 43 चेंडूत 58 धावांची झंझावती खेळी केली. तर संजू सॅमसन याने 26 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड याने एक षटकार आणि चार चौकार ठोकले. तर संजू सॅमसन याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 71 धावांची दमदार भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्याआधी यशस्वी जायस्वाल याने 11 चेंडूत 18 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. तिलक वर्मा याला आजच्या सामन्यातही लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पहिल्या सामन्यात तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार झाला होता. तर आजच्या सामन्यात तिलक वर्मा याला फक्त दोन धावा करता आल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.