Ind vs Eng : शामी की सिराज ? लखनौमध्ये कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11?

26
Ind vs Eng : शामी की सिराज ? लखनौमध्ये कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11?

सध्या सुरू असलेल्या 2023 विश्वचषक स्पर्धेतील 29व्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सामना आज रविवार म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी लखनौ येथे गतविजेत्या इंग्लंडशी (Ind vs Eng) होणार आहे. चार सामन्यांत केवळ एका विजयासह इंग्लंड गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. तर भारत आपली विजयी घोडदौड कायम ठेवून अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल. माजी कर्णधार विराट कोहलीने या स्पर्धेत एक शतक आणि तीन अर्धशतकांसह पाच सामन्यांत 354 धावा केल्या असून तो स्पर्धेतील भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. (Ind vs Eng)

मोहम्मद शामी की सिराज ?

तीन फिरकी गोलंदाजांना (Ind vs Eng) संघात स्थान द्यायचे झाल्यास कोणत्या वेगावान गोलंदाजाला बेंचवर बसावे लागणार? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह प्लेईंग 11 मध्ये कायम असेल. पण मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी यांच्यापैकी एका गोलंदाजाला बेंचवर बसवण्याची शक्यता आहे. सिराज भारतीय संघाचा दुसरा प्रमुख गोलंदाज म्हणून विश्वचषकात खेळला, पण न्यूझीलंडविरोधात शामीने (Ind vs Eng) पाच विकेट घेत आपली दावेदारीही भक्कम केली आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा कोणाला बेंचवर बसवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सूर्यकुमार यादव की ईशान किशन?

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Ind vs Eng) अनुपस्थितीत एक फलंदाज आणि गोलंदाज खेळवावा लागतो. न्यूझीलंविरोधात सूर्याला (सूर्यकुमार यादव) संधी देण्यात आली होती, पण तो या संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला आहे. आता ईशान किशन याला संधी देणार की पुन्हा सूर्यालाच मैदानात उतरवणार याकडे देखील चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. ईशान किशन डावखुरा असल्यामुळे त्याला संधी दिली जाऊ शकते, असा काहींचा तर्क आहे. (Ind vs Eng)

(हेही वाचा – Twitter Financial Service : एलॉन मस्क यांनी दिले ट्विटवर आर्थिक सेवा सुरू करण्याचे संकेत )

अशी असेल भारताची प्लेईंग 11  –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, अश्विन/सिराज, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव. (Ind vs Eng)

भारत आणि इंग्लंडमध्ये (Ind vs Eng) आतापर्यंत 106 एकदिवसीय सामने झाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.