Ind vs Eng 4th Test : रांची कसोटीत ७२ धावांच्या भागिदारी दरम्यान शुभमनने जुरेलला काय सल्ला दिला?

रांची कसोटीत शुभमन आणि जुरेल यांनी सहाव्या गड्यासाठी नाबाद ७२ धावांची भागिदारी करत भारताला विजयी केलं. 

147
Ind vs Eng 4th Test : रांची कसोटीत ७२ धावांच्या भागिदारी दरम्यान शुभमनने जुरेलला काय सल्ला दिला?
  • ऋजुता लुकतुके

रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय संघाला विजयासाठी १५२ धावा हव्या होत्या. आणि १० ही गडी बाद व्हायचे होते. पण, थोडीशी भीती होती ती या मालिकेत बॅझ-बॉल क्रिकेटने अचानक धक्के देणाऱ्या इंग्लिश संघाची. आणि ही भीती थोडी खरीही ठरली. रोहित आणि यशस्वी या सलामीच्या जोडीने ९२ धावांची भागिदारी तर केली. पण, पुढील पाच गडी अक्षरश: २८ धावांत बाद झाले. आणि भारताची अवस्था १२० धावांवर ५ गडी अशी झाली. (Ind vs Eng 4th Test)

पण, अशावेळी पहिल्या डावात शांत वृत्तीने फलंदाजी करणारा ध्रुव जुरेल पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आला. तर शुभमन गिलने ज्येष्ठ भागिदाराचा भूमिका निभावली. नाबाद ७२ धावांची भागिदारी करत दोघांनी भारताला विजय मिळवून दिला. शुभमन गिलने नाबाद ५२ धावा केल्या. तर जुरेलही ४१ धावांवर नाबाद राहिला. (Ind vs Eng 4th Test)

(हेही वाचा – Suzuki Burgman Street Electric : भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत सुझुकीचा दणक्यात प्रवेश)

शुभमनने जुरेलला दिला हा सल्ला 

या खेळी दरम्यान शुभमन गिल सीनिअर खेळाडू होता. जुरेल फलंदाजीला आला तेव्हा त्याने जुरेलला आधीच्या डावाप्रमाणेच खेळण्याचा सल्ला दिला. ‘आधीच्या डावात त्यानेच भारताला ३०० धावांचा टप्पा गाठून दिला होता. तेव्हा जे धैर्य दाखवलं तेच आताही दाखवण्याचा सल्ला त्याला मी दिला. भागिदारीची गरज होती. त्यामुळे एकेरी-दुहेरी धावा काढण्याचं आम्ही ठरवलं,’ असं शुभमनने सामन्यानंतर बोलताना सांगितलं. (Ind vs Eng 4th Test)

तर जुरेलने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शैलीत केलेल्या बदलांविषयी सांगितलं. ‘पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात चेंडू वळत होता. त्यामुळे मी पदलालित्य दाखवून क्रीझमध्ये रेंगाळायचं नाही हे धोरण ठेवलं. त्यामुळे माझ्या विरुद्ध पायचीतचा धोका टळला. आणि एकेरी धावाही निघत गेल्या,’ असं जुरेल सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यावर म्हणाला.  जुरेलने पहिल्या डावातही ९० धावा केल्या होत्या. तर ३ इंग्लिश फलंदाजांचे झेलही त्याने पकडले. (Ind vs Eng 4th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.