Ind vs Eng 4th Test : जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती?

तेज गोलंदाज जसप्रीत बुमरा या मालिकेतील सर्वात जास्त बळी टिपणारा गोलंदाज आहे. 

171
Ind vs Eng 4th Test : जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती?
Ind vs Eng 4th Test : जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती?
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील ॲक्शन आता झारखंडमधील रांची शहरात पोहोचणार आहे. पण, यावेळी तिथे तेज गोलंदाज जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) नसेल. सतत खेळल्यामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी संघ प्रशासनाने बुमराला (Jasprit Bumrah) एका कसोटीसाठी विश्रांती देण्याचं ठरवलं आहे. बीसीसीआयच्या (BCCI) दीर्घकालीन रणनीतीचाच हा भाग असल्याचं समजतंय. २३ फेब्रुवारीपासून चौथी कसोटी सुरू होत आहे. (Ind vs Eng 4th Test)

भारतीय संघ (Indian team) मंगळवारी उशिरा रांचीला पोहचणार आहे. पण, संघाबरोबर बुमरा नसेल. फक्त इतकंच नाही तर बुमरा पाचवी आणि शेवटची कसोटी खेळेल की नाही, हे रांची कसोटीच्या निकालावरून ठरवण्यात येणार आहे. क्रिकबझ या वेबसाईटने याविषयीची बातमी दिली आहे. (Ind vs Eng 4th Test)

(हेही वाचा – PM-Usha Scheme : मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटीचे अनुदान मंजूर)

खेळाडूंना अधून मधून विश्रांती मिळावी, बीसीसीआयचा प्रयत्न

मंगळवारी बुमरा (Jasprit Bumrah) अहमदाबादला जाईल आणि तिथून विमान पकडून तो घरी परतणार आहे. हैद्राबाद, विशाखापट्टणम आणि राजकोट असा तीन कसोटींत बुमराने आतापर्यंत ८१ षटकं टाकली आहेत. आणि यात आतापर्यंत सर्वाधिक १७ बळी टिपले आहेत. विशाखापट्टणम कसोटीत सिराजला विश्रांती देण्यात आली होती. तसाच निर्णय आता बुमराच्या बाबतीत घेण्यात आला आहे. (Ind vs Eng 4th Test)

बुमरा (Jasprit Bumrah) ऐवजी बदली खेळाडू दिला जाईल का हे निश्चित करण्यात आलेलं नाही. पण, मुकेश कुमारला तिसऱ्या कसोटीपूर्वी रणजी खेळण्यासाठी संघातून मुक्त करण्यात आलं होतं. तो आता रांचीपूर्वी संघाबरोबर परतेल. २०२४ मध्ये आयपीएल (IPL), टी-२० विश्वचषक (T20 World Cup) अशा महत्त्वाच्या स्पर्धांबरोबरच खडतर असा ५ कसोटींचा ऑस्ट्रेलिया दौराही आहे. त्यामुळे खेळाडूंना अधून मधून विश्रांती मिळावी, असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. (Ind vs Eng 4th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.