Ind vs Eng 2nd Test : विक्रम राठोड यांनी संघातील युवा फलंदाजांना दिला ‘हा’ सल्ला

दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय फलंदाजांसमोर अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत. सर्फराझ खान, रजत पाटिदार आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी दोन खेळाडू कसोटी पदार्पण करू शकतात.

175
Ind vs Eng 2nd Test : विक्रम राठोड यांनी संघातील युवा फलंदाजांना दिला ‘हा’ सल्ला

ऋजुता लुकतुके

एरवी फलंदाजी ही भारतीय संघाची जमेची बाजू. पण, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत (Ind vs Eng 2nd Test) फलंदाजीवरच आव्हानं उभी राहिली आहेत. स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन कसोटींत खेळत नाहीए. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी संघात स्थान तर मिळवलंय. पण, त्यांचा फॉर्म बरा नाहीए. यशस्वी आणि रोहीत चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेत. त्यातच भर म्हणून आता पहिल्या कसोटीत सर्वाधिक धावा केलेले के एल राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेत.

(हेही वाचा – Budget 2024 : जाणून घ्या अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट किती वेळात पूर्ण केलं ?)

अशावेळी फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी भारतीय फलंदाजांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

पहिल्या डावात १९० धावांची आघाडी असतानाही भारतीय संघाने (Ind vs Eng 2nd Test) हैद्राबाद कसोटी २८ धावांनी गमावली. त्यामुळे भारतीय संघ सध्या बॅकफुटवर गेला आहे. ‘भारतीय संघातील अनेक फलंदाज सध्या नवखे आहेत. त्यांना जम बसायला वेळ मिळाला पाहिजे. त्यांनीही संयम ठेवून फलंदाजी केली पाहिजे,’ असं विक्रम राठोड पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

खेळपट्टी आणि वातावरण कसं आहे हे पाहून रणनीती ठरवता येते –

शुभमन गिलने मागच्या ९ कसोटी डावांमध्ये अर्धशतक केलेलं नाही. तर श्रेयस अय्यरच्या कामगिरीतही (Ind vs Eng 2nd Test) सातत्याचा अभाव आहे. ‘निर्धाराने खेळणं आणि आक्रमक क्रिकेट खेळणं यात फरक आहे. मला संघातील खेळाडू निर्धाराने खेळलेले पाहायचे आहे. खेळपट्टी आणि वातावरण कसं आहे हे पाहून रणनीती ठरवता येते,’ असं विक्रम यांनी युवा फलंदाजांच्या बाबतीत बोलताना सांगितलं.

(हेही वाचा – PM Narendra Modi : “आजचा अर्थसंकल्प म्हणजे तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब”)

तसंच पहिल्या कसोटीतील पराभवासाठी त्यांनी फलंदाजांनाच दोषी धरलं आहे.

‘फलंदाजांनी शिस्तपूर्ण खेळ करायला हवा होता का? मला वाटतं, हो. आम्ही पारंपरिक पद्धतीने खेळलो. उलट पदलालित्य दाखवून खेळायला हवं होतं,’ असं राठोड हैद्राबाद कसोटीविषयी (Ind vs Eng 2nd Test) बोलताना म्हणाले.

इंग्लिश फलंदाजांच्या आक्रमक खेळाचं कौतुक करतानाच भारतीय संघाने घाबरण्याची गरज नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. ‘इंग्लिश फलंदाजांनी आम्हाला चकवलं हो खरंच. पण, भारतीय खेळपट्ट्यांवर (Ind vs Eng 2nd Test) कसं खेळायचं हे आम्हाला ठाऊक आहे. फक्त आम्ही तसा खेळ हैद्राबादमध्ये केला नाही. इथं जिंकायचीही आम्हाला सवय आहे. आधीच्या चुका टाळल्या तर आम्हाला घाबरायची काहीही गरज नाही,’ असं शेवटी राठोड म्हणाले.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस यांनी मानले अर्थमंत्र्यांचे आभार)

इंग्लंड बरोबरची दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमला सुरू होणार आहे. भारतीय संघाकडून (Ind vs Eng 2nd Test) सर्फराझ खान, रजत पाटिदार आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी दोन खेळाडू कसोटी पदार्पण करू शकतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.