Ind vs Eng 1st Test : कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचं कौतुक का केलं?

विराट कोहलीची उणीव भारतीय संघाला पहिल्या हैद्राबाद कसोटीत नक्कीच जाणवली. 

236
T20 World Cup, Ind vs SA : आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीची रोहित आणि द्रविडकडून पाठराखण
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडच्या बॅझ-बॉल क्रिकेटला भारताचा विराट कोहली (Virat Kohli) उत्तर देईल असं या कसोटी मालिकेपूर्वी बोललं जात होतं. पण, नेमकी विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघातून माघार घेतली आहे. घरगुती कारणांमुळे तो या कसोटी खेळू शकणार नाहीए. आणि त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्माला त्याची आठवण येणं स्वाभाविक आहे. (Ind vs Eng 1st Test)

संघातील चौथ्या क्रमांकावरील खमका फलंदाज आणि फलंदाजीचा आधार असलेला विराट त्याच्या तंदुरुस्तीसाठीही ओळखला जातो. आणि नेमकी हीच त्याची गोष्ट रोहितला अनुकरणीय वाटते. जिओ सिनेमावरील एका मुलाखतीच्या कार्यक्रमात रोहितने त्याची तंदुरुस्ती अधोरेखित केली आहे. (Ind vs Eng 1st Test)

‘मी इतकी वर्ष विराटला पाहतो आहे. पण, दुखापत किंवा तंदुरुस्तीमुळे तो कधी बंगळुरूच्या अकादमीत दाखल झालेला मी पाहिलेला नाही. त्याचा हा विक्रम मला सगळ्यात जास्त आवडतो. आणि तरुणांनी त्याच्याकडून हे शिकायला हवं. त्याचा कव्हर-ड्राईव्ह, फ्लिक, कट हे फटके तर आहेतच. पण, तंदुरुस्ती जास्त महत्त्वाची आहे असं मला वाटतं,’ असं रोहित (Rohit Sharma) माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकशी बोलताना म्हणाला. (Ind vs Eng 1st Test)

(हेही वाचा – Aus vs WI Brisbane Test : विंडिज संघाला २६ वर्षांनंतर जिंकताना पाहून ब्रायन लाराचे डोळेही जेव्हा पाणावले)

विराट आणि रोहित हे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ 

संघाप्रती त्याच्या निष्ठेचंही त्याने कौतुक केलं. ‘आतापर्यंत त्याने क्रिकेटमध्ये बरंच काही मिळवलं आहे. पण, तो संघाचाच विचार आधी करतो. आणि संघ हिताला प्राधान्य देतो. खेळाडूंना सतत प्रेरित करतो. हे त्याचे गुण मला आवडतात,’ असं रोहित म्हणाला. दर्जासाठी भुकेला असलेला विराट आणि सतत क्रियाशील राहण्याची त्याची ऊर्जा रोहितलाही प्रेरित करते. (Ind vs Eng 1st Test)

आपण जे करतो त्यासाठी प्रेम बाळगणं आणि मग स्वत:ला त्यासाठी झोकून देणं हे विराटचे सगळ्यात मोठे गुण असल्याचं मतही रोहितने (Rohit Sharma) बोलून दाखवलं. डिसेंबर २०२१ मध्ये रोहित शर्माने विराटकडून कप्तानीची सूत्र हातात घेतली. आणि सुरुवातीच्या दिवसांत दोघांमध्ये विस्तव जात नाही, अशा बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या. पण, हळू हळू दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतलं. आणि आता भारतीय फलंदाजीचे ते दोन आधारस्तंभ मानले जातात. (Ind vs Eng 1st Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.