Ind vs Eng 1st Test : पहिल्या कसोटीमधील धक्कादायक पराभवानंतर कर्णधार रोहित ‘या’ खेळाडूंवर नाराज 

हैद्राबाद कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांवर निर्विवाद वर्चस्व गाजवूनही अखेर भारतीय संघाचा इंग्लंडकडून २८ धावांनी पराभव झाला. 

208
Ind vs Eng 1st Test : पहिल्या कसोटीमधील धक्कादायक पराभवानंतर कर्णधार रोहित ‘या’ खेळाडूंवर नाराज 
Ind vs Eng 1st Test : पहिल्या कसोटीमधील धक्कादायक पराभवानंतर कर्णधार रोहित ‘या’ खेळाडूंवर नाराज 
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या हैद्राबाद कसोटीत इंग्लंडचं आक्रमक आणि नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळे फटके खेळण्याचं धोरण कमालीचं यशस्वी ठरलं. आणि पाहुण्या इंग्लंडने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारताचा २८ धावांनी पराभव केला. कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी २३१ धावा करण्याचं आवाहन होतं. चौथ्या दिवसाची २ आणि पाचव्या दिवसाची ३ सत्र हातात होती. शिवाय खेळपट्टीही फलंदाजीसाठी खूप खराब म्हणावी अशी नव्हती. तरीही भारतीय संघ शेवटच्या सत्रात २०२ धावांत गुंडाळला गेला. आणि मालिकेत इंग्लंडने महत्त्वाची अशी १-० आघाडी घेतली. (Ind vs Eng 1st Test)

पहिल्या डावात १९० धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडने दुसऱ्या डावात भारतीय फिरकीला समर्थपणे खेळत फलकावर ४२० धावा लावल्या. आणि भारताच्या कसलेल्या फलंदाजांना २३१ धावांचं आव्हान पेलवलं नाही. इंग्लिश युवा फिरकीपटू टॉम हार्टलेनं ७ गडी बाद केले. (Ind vs Eng 1st Test)

२३१ चं आव्हान भारतीय संघासाठी कठीण नव्हतं, असं कर्णधार रोहित शर्मालाही वाटतं. सामन्यानंतर त्याने पराभवासाठी फलंदाजांनाच जबाबदार धरलं. (Ind vs Eng 1st Test)

(हेही वाचा – Governor Ramesh Bais : लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत युवकांचा सहभाग आवश्यक)

रोहितला लपवता येत नव्हत नैराश्य 

‘आमचं नेमकं कुठे चुकलं ते नक्की सांगता येणार नाही. तिसऱ्या दिवशी आमच्याकडे १९० धावांची पहिल्या डावातील आघाडी होती. सगळं नीट चाललं होतं. पण, नंतरच्या २ दिवसांत आम्ही वर्चस्व गमावलं. उलट तळाच्या फलंदाजांनी आम्हा वरच्या फळीतील फलंदाजांना दाखवून दिलं की, या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी,’ असं चेहरा पडलेल्या रोहित शर्माने सामना संपल्यानंतर सांगितलं. (Ind vs Eng 1st Test)

इंग्लिश फलंदाजीचं त्याने कौतुक केलं. आणि त्याचबरोबर दुसऱ्या डावात १९६ धावा करून इंग्लंडला ४२० धावांचा डोंगर उभा करून देणाऱ्या पोपचं विशेष कौतुक केलं. ‘त्याने आणि इतर इंग्लिश फलंदाजांनी स्विप आणि रिव्हर्स स्विपचा प्रभावी वापर केला. या रणनीतीमुळे त्यांनी भारतीय फिरकीपटूंनाही पेचात पकडलं. पण, त्याहून महत्त्वाचं म्हणजे, चौथ्या डावातही २३१ धावा करण्या सारख्या होत्या. पण, आम्हाला ते जमलं नाही,’ रोहितला नैराश्य लपवता येत नव्हतं. इंग्लंडने आता मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम इथं सुरू होईल. (Ind vs Eng 1st Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.