Ind vs Eng 1st Test : इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ऑली पोपला जेव्हा प्रेक्षकांनी मानवंदना दिली

इंग्लंडचा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज ऑली पोपने १९६ धावांची खेळी करत इंग्लंडला सामन्यात परत खेचून आणलं. 

152
Ind vs Eng 1st Test : इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ऑली पोपला जेव्हा प्रेक्षकांनी मानवंदना दिली
Ind vs Eng 1st Test : इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ऑली पोपला जेव्हा प्रेक्षकांनी मानवंदना दिली
  • ऋजुता लुकतुके

ऑली पोप हा इंग्लिश संघाचा उपकर्णधारही आहे. आणि त्याने आपल्यावरील जबाबदारी सार्थ ठरवताना इंग्लिश संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. पहिल्या डावात १९० धावांची पिछाडी असताना इंग्लंडचा निम्मा संघ दुसऱ्या डावातही १६३ धावांमध्ये बाद झाला होता. कर्णधार बेन स्टोक्सही माघारी परतला होता. पण, ऑली पोपने एक बाजू लावून धरली. इतकंच नाही तर तळाच्या बेन फोक्स आणि टॉम हार्टलीबरोबर शतकी आणि ८० धावांची भागिदारी रचत त्याने इंग्लंडचा दुसरा डाव चारशेच्या पार नेला. (Ind vs Eng 1st Test)

भारतीय फिरकी गोलंदाजांना सढळ हाताने स्विप आणि रिव्हर्स स्विपचे फटके मारत त्याने अश्विन, जाडेजा आणि अक्षर यांची लय बिघडवली. आणि भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांना निष्प्रभ कसं करायचं याचा परिपाठच घालून दिला. शेवटी जसप्रीत बुमराच्या एका हळू आलेल्या चेंडूवर त्याचा एरवी न चुकणारा रिव्हर्स स्विपचा फटका चुकला आणि तो १९६ वर बाद झाला. (Ind vs Eng 1st Test)

पोप तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. आणि बाद होणारा तो शेवटचा खेळाडू होता. विशेष म्हणजे सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकांच्या फलंदाजांना हाताशी धरत त्याने तब्बल २५६ धावा वाढवल्या. त्यामुळेच इंग्लिश संघ भारतासमोर २३१ धावांचं आव्हान उभं करू शकला. हैद्राबादमध्ये रविवारच्या दिवशी २७,००० च्या वर प्रेक्षक हा सामना बघायला जमले होते. (Ind vs Eng 1st Test)

(हेही वाचा – Reliance Industries Share: रिलायन्सच्या शेअर्सनी गाठला विक्रमी उच्चांक, मार्केट कॅपमध्ये किती टक्क्यांची वाढ झाली; वाचा सविस्तर)

पोप बाद झाला तेव्हा सगळ्यांनी उभं राहून त्याला मानवंदना दिली. अगदी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूनेही त्याचं अभिनंदन केलं. (Ind vs Eng 1st Test)

इतकंच नाही तर पोप तंबूत परतला तेव्हा त्याचे संघ सहकारी आणि सपोर्ट स्टाफ यांनीही उभं राहून त्याला मानवंदना दिली. सामनावीराचा किताबही त्यालाच मिळाला. (Ind vs Eng 1st Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.