IND vs AUS 2nd ODI: पावसामुळे पुन्हा खेळ थांबला

पाऊस येण्यापूर्वी ९ षटकांचा खेळ झाला होता.

71
ऊस येण्यापूर्वी ९ षटकांचा खेळ झाला होता.
ऊस येण्यापूर्वी ९ षटकांचा खेळ झाला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (IND vs AUS 2nd ODI) रविवारी (२४ सप्टेंबर) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंदूरमध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. पाऊस येण्यापूर्वी ९ षटकांचा खेळ झाला होता.

यादरम्यान ऑस्ट्रेलियाने २ गडी गमावून५६ धावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नर २४ चेंडूत २६ धावांवर तर मार्नस लॅबुशेन २१ चेंडूत १७ धावांवर खेळत आहे. या सामन्यात भारत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. मालिकेत अनिर्णित राहण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष असेल. याआधी भारताने मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५ विकेटने पराभव केला होता. इंदूरमध्ये भारत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत आहे.

(हेही वाचा : IND Vs AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.