Ind vs Afg 2nd T20 : भारताला खुणावतोय मालिका विजय, विराट कोहली संघात दाखल

भारतीय संघासाठी अफगाणिस्तान विरुद्धचा विजय नाही, तर संघाने एकत्र येणं महत्त्वाचं.

167
Ind vs Afg 2nd T20 : भारताला खुणावतोय मालिका विजय, विराट कोहली संघात दाखल
Ind vs Afg 2nd T20 : भारताला खुणावतोय मालिका विजय, विराट कोहली संघात दाखल
  • ऋजुता लुकतुके

आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघासाठी अफगाणिस्तान सारख्या दुबळ्या संघाविरुद्ध मालिका जिंकणं हे तितकंसं मोठं नाही. आताही भारतीय संघ (Indian team) दुसऱ्या फळीचा आहे. तरी पहिल्या टी-२० (T20) सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने (Indian team) १-० अशी आघाडीही घेतली आहे. आता दुसरा टी-२० सामना इंदूरला होणार आहे. आणि या सामन्यात तर रोहीत आणि विराट एकत्र खेळणार आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी आणि त्यातही संघातील होतकरु खेळाडूंना दोन दिग्गजांबरोबर खेळण्याचा परिपूर्ण अनुभवही मिळेल. बाकी म्हटलं तर मालिका विजयाचं उद्दिष्टं भारतासमोर असेलच. त्याशिवाय संघातील खेळाडूंसमोर टी-२० (T20) विश्वचषकाचं आव्हान असेल. म्हणजे विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवण्याचं आव्हान. (Ind vs Afg 2nd T20)

खासकरून जितेन शर्मा, तिलक वर्मा आणि अक्षर पटेल तर संघाच्या दरवाजाकडे डोळे लावून बसलेत. आतापर्यंत त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आता त्यांना दावेदारी मजबूत करायची आहे. के एल राहुलवर निवड समितीने टी-२० (T20) साठी विश्वास दाखवलेला नाही. तर इशान किशनने स्वत:ला आता बऱ्यापैकी दूर ढकललंय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या सामन्यात जितेनला पहिल्यांदा संधी मिळाली. तिथपासून ३० वर्षीय मुंबईकराने सातत्याने आपल्यावरील जबाबदारी निभावली आहे. (Ind vs Afg 2nd T20)

(हेही वाचा – Uddhav Thackeray : अयोध्येतील सोहळ्याचे राजकारण करत नसल्याचे म्हणणारे उद्धव ठाकरे म्हणतात, श्रीराम मूर्तीची स्थापन राष्ट्रपतींच्या हस्ते करा)

विजयासाठी भारतीय संघाला करावे लागणार प्रयत्न 

त्याच्याबरोबर तिलक वर्मा आणि अक्षर पटेलही सध्या निवड समितीची पहिली पसंती आहेत. पण, इतर ज्येष्ठ खेळाडू म्हणजे राहुल, श्रेयस, सुर्यकुमार आणि गोलंदाजीत कुलदीप, जाडेजा, अश्विन आणि चहल यांच्याशी तुलना आणि स्पर्धा होईल, तेव्हा या दोघांना वरचढ ठरावं लागेल. बाकी रिंकू सिंग नक्कीच सहाव्या क्रमांकावर पाय रोवून उभा आहे. (Ind vs Afg 2nd T20)

आता टी-२० चे उर्वरित दोन सामने आणि मग अख्खी आयपीएल खेळाडूंना खेळून काढायची आहे. आणि स्वत:ला तसंच तंदुरुस्तीला सिद्ध करायचं आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाला मालिकेत निदान एकतरी विजय मिळवायचा असेल. मोहम्मद नाबीने आपला फॉर्म पहिल्या सामन्यात दाखवून दिला आहे. आता गरज आहे ती विजयाची. त्यासाठी भारतीय संघ दुसऱ्या फळीचा असला तरी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. (Ind vs Afg 2nd T20)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.