Ind vs Ban : विराटने आपल्या शतकाबद्दल के एल राहुलला काय सांगितलं होतं?

बांगलादेश विरुद्ध विजयासाठी भारताला २० धावांची गरज होती तेव्हा विराटही शतक पूर्ण करण्यासाठी तितक्याच धावा हव्या होत्या.

28
Ind vs Ban : विराटने आपल्या शतकाबद्दल के एल राहुलला काय सांगितलं होतं?
Ind vs Ban : विराटने आपल्या शतकाबद्दल के एल राहुलला काय सांगितलं होतं?
  • ऋजुता लुकतुके

बांगलादेश विरुद्ध विजयासाठी भारताला २० धावांची गरज होती तेव्हा विराटही शतक पूर्ण करण्यासाठी तितक्याच धावा हव्या होत्या. अशावेळी विराट आणि के एल राहुल यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला? (Ind vs Ban)

भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकातील चारही सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत आणि यात ऑस्ट्रेलिया तसंच पाकिस्तानच्या तगड्या संघांना त्यांनी २०० च्या आत गुंडाळण्याची किमयाही साधली. जिथे धावांच्या पाठलागाचा प्रश्न येतो तिथे रोहीत शर्मा आणि विराट कोहली आपल्या तडाखेबंद फलंदाजीने ती जबाबदारी पार पाडत आहेत. (Ind vs Ban)

विराट कोहलीला आजही धावांचा पाठलाग करण्यामध्ये माहीर समजलं जातं. पण, काल बांगलादेशच्या २६७ धावांचा पाठलाग करताना एक वेगळाच पेच त्याच्यासमोर उभा होता. ३९ षटकांनंतर भारताच्या ३ बाद २३८ धावा झाल्या होत्या. विजयासाठी संघाला हव्या होत्या २० धावा आणि विराटही तेव्हा ८० धावांवरच खेळत होता. दुसरा फलंदाज के एल राहुल ३४ धावांवर नाबाद होता. (Ind vs Ban)

इथं विराट आणि राहुलसमोर पेच होता की एकेरी-दुहेरी धावा घेऊन विजयाला प्राधान्य द्यायचं की विराटने शतक पूर्ण करण्याला प्राधान्य द्यायचं. याविषयी दोन्ही फलंदाजांमध्ये नेमकं काय बोलणं झालं ते के एल राहुलने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे आणि ते मनोरंजक आहे. (Ind vs Ban)

राहुल म्हणतो त्याप्रमाणे विराट आधी शतकासाठी डावपेच बदलायला तयार नव्हता. ‘तो थोडासा गोंधळलेला होता. त्याचं म्हणणं होतं की, एकेरी धाव न घेणं बरोबर नाही. विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा आहे आणि यात भारताचा विजय महत्त्वाचा. त्याने वैयक्तिक शतकासाठी प्रयत्न केला असं चित्र निर्माण झालेलं त्याला नको होतं,’ असं राहुल सामन्यानंतर बोलताना म्हणाला. (Ind vs Ban)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम )

विराट गोंधळलेला असताना त्याला काय सांगितलं हे सांगताना राहुल म्हणतो, ‘मी त्याला म्हटलं विश्वचषक आहे हे खरं आहे. पण, ही अंतिम फेरी किंवा निर्णायक सामना नाही. त्याला अजून वेळ आहे. आता तो शतकासाठी शैलीत काही बदल करू शकतो. (Ind vs Ban)

राहुलने बांगलादेशी गोलंदाजांच्या वाईड टाकण्याच्या प्रयत्नावरही भाष्य केलं. त्यांचा प्रयत्न वाईड टाकून सामना संपवण्याचा होता आणि बांगलादेशचा कर्णधार असतो तर गोलंदाजांना समजावलं असतं, असं राहुल म्हणाला. पण, अखेर विराट कोहलीचं शतक पूर्ण झालं याविषयी तो समाधानी आहे. (Ind vs Ban)

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात राहुलवरही अशीच वेळ आली होती. पण, तेव्हा त्याचं धावांचं गणित चुकलं. चौकार म्हणून त्याने मारलेला चेंडू थेट सीमेपार गेला आणि भारताचा विजय पूर्ण झाल्यामुळे राहुलला ९७ धावांवर नाबाद राहावं लागलं होतं. (Ind vs Ban)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.