ICC Womens World Cup 2025 : एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान ‘या’ दिवशी आमने-सामने

ICC Womens World Cup 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीसी)कडून महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा एकदिवसीय विश्वचषकाचे यजमान भारताकडे असणार असून पाकिस्तान सर्व समाने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळणार आहे.

55

ICC Womens World Cup 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीसी)कडून महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा एकदिवसीय विश्वचषकाचे यजमान भारताकडे असणार असून पाकिस्तान सर्व समाने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळणार आहे. विश्वचषकातील पहिल्या सामन्याची सुरूवात भारत विरुध्द श्रीलंका यांच्यात बंगळुरू येथून होणार आहे. ३० सप्टेंबर ते ०२ नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, भारताकडे यजमानपद असल्याने पाकिस्तानचे सर्व सामने हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहेत.

(हेही वाचा Gold Rate : मध्य-पूर्वेतील अनिश्चिततेमुळे सोने पुन्हा महाग; ‘या’ मौल्यवान धातूने गाठला नवा उच्चांक )

 

दरम्यान, आयसीसीकडून विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून दोन्ही देशांमधील पाच शहरांमध्ये सामने खेळविले जाणार आहेत. ज्यात बंगळुरू, विशाखापट्टणम, इंदूर, गुवाहाटी व कोलंबो याठिकाणी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, अंतिम सामना ०२ नोव्हेंबरला बंगळुरू किंवा कोलंबो येथे खेळविण्यात येईल. २६ ऑक्टोबरला दोन सामने खेळविण्यात येतील हा अपवाद वगळता, दिवसाला एक सामना खेळविण्यात येईल.

कोण-कोणते संघ विश्वचषकास पात्र ठरले?

स्पर्धेतील अव्वल सहा संघांनी विश्वचषकासाठी निश्चितपणे पात्रता मिळवली. यजमान भारतासोबत इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांनीही महिला अजिंक्यपद स्पर्धेद्वारे आपले स्थान निश्चित केले. अंतिम दोन स्थानं वर्षाच्या सुरुवातीला महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीने निश्चित केली होती. एप्रिलमध्ये झालेल्या क्वालिफायरमध्ये पाकिस्तान व बांगलादेशने पहिल्या दोन स्थानांवर राहून आपली जागा निश्चित केली.

असे असतील भारतीय महिला संघाचे सामने 

भारत विरुध्द श्रीलंका, ३० सप्टेंबर २०२५, बंगळुरू

भारत विरुध्द पाकिस्तान, ०५ ऑक्टोबर २०२५, कोलंबो

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका, ०९ ऑक्टोबर २०२५, विशाखापट्टणम

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया, १२ ऑक्टोबर, विशाखापट्टणम

भारत विरुध्द इंग्लंड, १९ ऑक्टोबर २०२५, इंदूर

भारत विरुध्द न्यूझीलंड, २३ ऑक्टोबर २०२५, गुवाहाटी

भारत विरुध्द बांग्लादेश, २६ ऑक्टोबर २०२५, बंगळुरू 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.