ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर

दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केल्यावर कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने आगेकूच केली आहे. 

182
ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर
  • ऋजुता लुकतुके

आयसीसी कसोटी अजिंक्यपद २०२३-२५ च्या शर्यतीत भारतीय संघ पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. आणि या विजयासह क्रमवारीतही मोठी उडी घेतली आहे. आधीच्या कसोटीतील अनपेक्षित पराभवामुळे भारतीय संघ क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरला होता. पण, आता भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. (ICC Test Ranking)

अव्वल क्रमांकावर अजूनही ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. महत्त्वाचं म्हणजे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघाने आता १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघाचे आता ५२.७७ पर्सेंटाईल गुण झाले आहेत. (ICC Test Ranking)

(हेही वाचा – BJP कडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात; ‘रामलला’चे दर्शन घडवणार; पण मोफत की सवलतीच्या दरात?)

भारत इंग्लंड दरम्यानची पुढची कसोटी ‘या’ तारखेला 

दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. क्रमवारीतील पहिले पाच संघ फक्त दोन पर्सेंटाईल गुणांच्या फरकाने मागे-पुढे आहेत. अव्वल संघांतील या चुरशीमुळे एका कसोटीतील निकालाने क्रमवारीत मोठे उलटफेर होत आहेत. पण, त्यामुळे रंगतही वाढत आहे. (ICC Test Ranking)

विशाखापट्टणम कसोटीत यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल या युवा फलंदाजांनी विजयात मोठा वाटा उचलला. यशस्वी जयसवालने पहिल्या डावात २०६ धावा करत आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय द्विशतक झळकावलं. तर दुसऱ्या डावात शुभमन गिलने १०४ धावा करत इंग्लंडसमोर ३९९ धावांचं लक्ष्य ठेवण्यात मोठी भूमिका बजावली. जसप्रीत बुमराने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर दोन्ही डावांत मिळून ९ बळी मिळवत भारताला विजयी केलं. आता भारत इंग्लंड दरम्यानची पुढची कसोटी १५ फेब्रुवारीला राजकोटला होणार आहे. (ICC Test Ranking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.