ICC Helps Pakistan : आयसीसीकडून भारताला मिळाले १२ कोटी रुपये; पाकला किती पैसे मिळणार?

ICC Helps Pakistan : बुडत्याला काडीचा आधार अशी पाक बोर्डाची अवस्था आहे. 

69
ICC Helps Pakistan : आयसीसीकडून भारताला मिळाले १२ कोटी रुपये; पाकला किती पैसे मिळणार?
  • ऋजुता लुकतुके

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ११ जून ते १५ जून दरम्यान होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणार आहे. भारताने यापूर्वी सलग दोन वेळा अंतिम फेरीत धडक दिली होती, मात्र यावेळी भारत अंतिम फेरीत पोहोचू शकलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षिसांची रक्कम जाहीर केली आहे. या मध्ये पाकिस्तानला देखील कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. (ICC Helps Pakistan)

आयसीसीने जाहीर केलेल्या बक्षिसांनुसार विजेत्या आणि उपविजेत्या संघांशिवाय इतर संघांना देखील रक्कम दिली जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पाकिस्तान शेवटच्या स्थानावर राहिला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून ४ लाख ८० अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात ४ कोटी रुपये मिळतील. (ICC Helps Pakistan)

(हेही वाचा – Virat Kohli Retires : विराटने निवृत्तीपूर्वी रवी शास्त्री यांच्याशी काय चर्चा केली होती?)

भारतीय क्रिकेट संघाने २०२१ आणि २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्ध भारताला विजय मिळवता आला नाही. याशिवाय भारताला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. (ICC Helps Pakistan)

विशेष म्हणजे ही कसोटी मालिका भारतात झाली होती. यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला होता. यामुळे भारताला तिसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आलं. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असल्यानं भारताला १२.३ कोटी रुपये मिळणार आहेत. यंदा कसोटीत अजिंक्यपद पटकावणाऱ्या संघाला ३०.७ कोटी रुपये मिळतील. तर, उपविजेत्या संघाला १८.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. (ICC Helps Pakistan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.