ICC Cricket World Cup IND VS NED : भारतीय क्रिकेट संघाने सामन्यात केली ‘नेट प्रॅक्टिस’; नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव 

95

भारतीय फलंदाजांचा रविवार, १२ नोव्हेंबर रोजी ICC Cricket World Cup च्या उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी परफेक्ट सराव झाला. नेदरलँड्सच्या गोलंदाजांना रविवार, १२ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये अक्षरशः फोडून काढले. ५० षटकांत ४१० धावा काढल्या. नेदरलँड्ससमोर  ४११ धावांचे लक्ष्य उभे केले होते. नेदरलँड्सचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मात्र रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार, शुभमन गिल या तीन फलंदाजांनी गोलंदाजी करून नेट प्रॅक्टिससारखा हा सामना खेळला. आत विराटला १ विकेट घेण्यास यश आले. भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला.

ICC Cricket World च्या सामन्यात भारतीय संघाने उभे केलेले मोठे आव्हान नेदरलँड्सला पेलणारे नव्हते, म्हणून भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांनी गोलंदाजीमध्ये पर्याय असावेत या उद्देशाने फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी दिली, ज्याचा उपयोग झाल्याचे दिसले. पण नेदरलँड्सच्या फलंदाजांनीही उत्तम खेळ केला. जोरदार फटकेबाजी केली, पण भारताने उभे केलेल्या आव्हानांपर्यंत पोहचू शकले नाही. शेवटी नेदरलँड्सचा   160 धावांनी पराभव झाला.

रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर व लोकेश राहुल यांनी दमदार खेळी केली. श्रेयसने त्याच्या अर्धशतकाचे शतकात रुपांतर केले आणि वर्ल्ड कपमधील हे त्याचे पहिले शतक ठरले. पाठोपाठ लोकेशनेही शतक पूर्ण केले आणि टीम इंडियाला चारशेपार पोहोचवले.

(हेही वाचा ICC Cricket World Cup IND VS NED : भारतीय क्रिकेट संघाकडून धावांची आतषबाजी; नेदरलँड्ससमोर ४१०धावांचा उभा केला डोंगर)

रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला नेहमीप्रमाणे दमदार सुरुवात करून दिली. दोघांची १०० धावांची भागीदारी १२व्या षटकात शुबमनच्या (५१) विकेटने तुटली. रोहितने तुफान फटकेबाजी करून अनेक विक्रम मोडले, परंतु त्याच्या खेळीला ६१ धावांवर ब्रेक लागला. विराट कोहली व श्रेयस यांच्या ७१ धावांच्या खेळीने डाव सावरला, परंतु नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी सरासरी खाली आणली होती. ५१ धावांवर विराटचा त्रिफळा उडाला आणि बंगळुरूचे स्टेडियम शांत झाले. मात्र, श्रेयसच्या आतषबाजीने ते पुन्हा दणाणले. श्रेयस व लोकेश राहुल यांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. लोकेशनेही ४० चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि वन डे क्रिकेटमध्ये आघाडीच्या पाच फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा करण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दोनवेळा भारताविरुद्ध असा पराक्रम केला होता. श्रेयसने ८४ चेंडूंत वर्ल्ड कपमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय ठरला. लोकेशनेही मग फटकेबाजी करताना शतकाच्या दिशेने वाटचाल केली. श्रेयसने ४९व्या षटकात श्रेयसने २५ धावा कुटल्या. लोकेशने ५०व्या षटकाची सुरुवात षटकाराने केली आणि पुन्हा षटकार खेचून ६२ चेंडूंत शतक झळकावले. त्याचेही वर्ल्ड कपमधील पहिले शतक ठरले. तो ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०२ धावांवर बाद झाला. श्रेयस ९४ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांसह १२८ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ४१० धावा केल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.