HS Prannoy Ranking : एच एस प्रणॉय कारकीर्दीतील सर्वोत्तम ६व्या क्रमांकावर 

दुहेरीत सात्विकसाईराज आणि चिराग ने आपला द्वितीय क्रमांक राखला आहे.

166
HS Prannoy Ranking : एच एस प्रणॉय कारकीर्दीतील सर्वोत्तम ६व्या क्रमांकावर 
HS Prannoy Ranking : एच एस प्रणॉय कारकीर्दीतील सर्वोत्तम ६व्या क्रमांकावर 

विश्वअजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य पदकानंतर एच एस प्रणॉयने जागतिक क्रमवारीत वैयक्तिक सर्वोत्तम क्रमांक मिळवला आहे. आता तो सहाव्या क्रमांकावर आहे. तर दुहेरीत सात्विकसाईराज आणि चिरागने आपला द्वितीय क्रमांक राखला आहे. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉयने कारकीर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी स्थान या आठवड्यात मिळवलं आहे. तो आता सहाव्या क्रमांकावर आहे. नुकत्याच संपलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या कामगिरीमुळे त्याला हे साध्य झालं आहे. गेल्यावर्षी डिसेंबरपासून प्रणॉयने जागतिक क्रमवारीत पहिल्या दहांतील स्थान त्याने कायम राखलं आहे.

मागच्या काही आठवड्यांत, प्रणॉयने विश्वअजिंक्यपद कांस्य पदकाबरोबरच मलेशियन सुपर सीरिज जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तो उपविजेता होता. या कामगिरीचा फायदा त्याला क्रमवारीत झाला आहे. भारताचा दुसरा इन-फॉर्म बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची मात्र क्रमवारीत थोडीफार घसरण झाली आहे. तो आता एका स्थानाच्या घसरणीसह १२व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर महिला एकेरीत पी व्ही सिंधू सध्या फारशा चांगल्या फॉर्ममध्ये नाही. पण, इतर मानांकीत खेळाडूंचा खराब फॉर्म आणि गैरहजेरी यामुळे क्रमवारीत तिचा फायदा झाला आहे. आणि ती एक स्थान वर चढून १४व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

(हेही वाचा – Unauthorized Hawkers : केशवसुत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमधील फेरीवाल्यांनी अडवली रेल्वे प्रवाशांची वाट)

पुरुषांच्या दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी आपलं द्वितीय स्थान राखून आहे. विश्वअजिंक्यपद स्पर्धेत भारतीय जोडी उपउपांत्य फेरीतच पराभूत झाली होती. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी क्रमवारीत आता सतरावं स्थान मिळवलं आहे. त्यांनी दोन स्थानांनी प्रगती केली आहे. विश्वअजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा आणि गायत्री यांच्यासाठी ड्रॉ कठीण होता. आणि अव्वल मानांकीत चेन किंग चेन, जिया यि फॅन या जोडीचा सामना त्यांना उपउपान्त्य फेरीत करावा लागला. या चायनीज जोडीने पुढे जाऊन विजेतेपद पटकावलं होतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.