Rohit Sharma : वानखेडे मैदानात स्टँडला नाव दिलं गेल्यावर रोहित शर्माला कसं वाटतंय?

एका पॉडकास्टमध्ये रोहितने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

80
Rohit Sharma : वानखेडे मैदानात स्टँडला नाव दिलं गेल्यावर रोहित शर्माला कसं वाटतंय?
Rohit Sharma : वानखेडे मैदानात स्टँडला नाव दिलं गेल्यावर रोहित शर्माला कसं वाटतंय?
  • ऋजुता लुकतुके

मुंबई क्रिकेट असोसिएशनने अलीकडेच वानखेडे स्टेडिअमवरील (Wankhede Stadium) एका स्टँडला रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूचं नाव स्टँडला देण्याची विराट कोहलीनंतर (Virat Kohli) ही दुसरी घटना असणार आहे. रोहित शर्माही (Rohit Sharma) या सन्मानामुळे भारावून गेला आहे. ‘अजूनही यावर विश्वास बसत नाही,’ असं रोहितने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे. ‘तुमचं नाव स्टेडिअममधील स्टँडला देण्यात येतं. तुमचा असा गौरव होईल अशी तुम्ही अपेक्षाही केलेली नसते,’ असं रोहित म्हणाला.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बरोबरीने अजित वाडेकर (Ajit Wadekar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचीही नावं इतर दोन स्टँडना देण्यात येणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या आठवड्यात झालेल्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतला आहे. दिवेचा पॅव्हेलियनच्या तिसऱ्या मजल्यावरील स्टँड आता रोहित शर्मा (Rohit Sharma) स्टँड असेल.

(हेही वाचा – उद्धव आणि राज एकत्र येणार? Uddhav Thackeray यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण)

ग्रँड स्टँड आता अजित वाडेकर (Ajit Wadekar) स्टँड असेल. तर ग्रँड स्टँडचा चौथा मजला शरद पवार (Sharad Pawar) स्टँड असणार आहे. अजित वाडेकर यांनी भारताला १९७१ मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून दिल्या होत्या. तर शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसीचे (ICC) माजी अध्यक्ष आहेत. शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना भारताने २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाचं यशस्वी आयोजन केलं होतं. तर वानखेडे स्टेडिअमचं नुतनीकरणही त्यांच्याच काळात पार पडलं.

रोहित शर्मानेही (Rohit Sharma) खेळाडू तसंच कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी योगदान दिलं आहे. त्याच्या कप्तानीखाली भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली. तर टी-२० विश्वचषक (T20 World Cup) आणि चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) विजेत्या भारतीय संघाचा तो कर्णधार होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.