पुरुष क्रिकेट संघासह महिला क्रिकेटपटूंनीही साजरी केली धुळवड 

138

देशभरात आज धुळवडीचा उत्साह दिसून आला. महाराष्ट्र, दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी रंग उधळण्यात आले. यात भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूही मागे नव्हते. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल यांच्यासह टीम इंडियातील सर्व खेळाडू रंगांची उधळण करताना व्हिडीओ बीसीसीआयने व्हायरल केला आहे. यात विराट कोहलीसह सर्व खेळाडू रंग बरसे या गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहेत. तशीच धुळवड महिला खेळाडूंनीही साजरी केली. सध्या वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूसोबत विदेशी महिला खेळाडूंनीही रंगाचा सण उत्साहात साजरा केला. यात स्मृती मंधाना, रिचा घोष आणि हिटर नाईट रंगात रंगलेल्या दिसत आहेत.

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) फायनलमध्ये थेट स्थान मिळवण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावा लागेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 मार्चपासून हा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्सपर्यंत पोहोचण्यासाठी काही करुन चौथ्या कसोटीत कांगारूंना चीतपट करावे लागणार आहे. तसेच थेट 3-1 ने कसोटी मालिका आपल्या खिशात घालावी लागेल. जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्समध्ये पोहोचली, तर फायनल्समध्ये टीम इंडियाचा सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाशी होईल. लंडनमध्ये 7 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळावली जाणार आहे.

(हेही वाचा राहुल गांधींचे चीन प्रेम; नेटकरी घेतायेत खरपूस समाचार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.