Hardik Pandya: मुंबई इंडियन्सने केवळ एका तासात गमावले ४ लाख फॉलोअर्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर…

मुंबई इंडियन्सच्या अकाउंटवर व्हिडियोखाली चाहते अनफॉलो मुंबई इंडियन्स हा ट्रेंड चालवत असल्याचे दिसून आले.

282
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सने केवळ एका तासात गमावले ४ लाख फॉलोअर्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर...
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सने केवळ एका तासात गमावले ४ लाख फॉलोअर्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर...

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी ६ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी धक्कादायक निर्णय घेतला. रोहित शर्माला डावलून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार करण्यात आले. या निर्णयामुळे सोशल मिडियावर मुंबई इंडियन्स ट्रेंडिंगवर असूनही तासाभरातच लाखो चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडली.

हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यानंतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म Xवर मुंबई इंडियन्सचे ४ लाख, तर इन्स्टाग्रामचे १ लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. यावरून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा मुंबई इंडियन्स संघाने घेतलेला निर्णय चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही तसेच मुंबई इंडियन्सच्या अकाउंटवर व्हिडियोखाली चाहते अनफॉलो मुंबई इंडियन्स हा ट्रेंड चालवत असल्याचे दिसून आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.