Gukesh Stuns Carlsen : पारंपरिक बुद्धिबळात डी गुकेशने केला मॅग्नस कार्लसनचा पराभव

Gukesh Stuns Carlsen : पराभवानंतर कार्लसन टेबलवर मूठ आदळत तिथून निघून गेला.

43
Gukesh Stuns Carlsen : पारंपरिक बुद्धिबळात डी गुकेशने केला मॅग्नस कार्लसनचा पराभव
  • ऋजुता लुकतुके

रविवारचा दिवस भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी आणखी एक महत्त्वाचा दिवस ठरला. माजी विश्वविजेता आणि पारंपरिक बुद्धिबळातील नंबर वन खेळाडू मॅग्नस कार्लसनचा डी गुकेशने पराभव केला. नॉर्वे बुद्धिबळ २०२५ स्पर्धेत काळे मोहरे घेऊन खेळणाऱ्या गुकेशने ही कामगिरी केली हे विशेष. खरंतर सुरुवातीपासून कार्लसनचं सामन्यावर वर्चस्व होतं. त्याने मध्यापर्यंत त्याने गुकेशला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, गुकेश वयापेक्षा जास्त प्रगल्भता दाखवत नेटाने कार्लसनचा मुकाबला केला. (Gukesh Stuns Carlsen)

(हेही वाचा – पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष Santiago Pena Palacios भारत दौऱ्यावर ! PM Modi म्हणाले, “विश्वास, व्यापार आणि सहकार्याला नवी ताकद…”)

डावात दडपण वाढत गेलं असताना वेळेच्या बाबतीत कार्लसन काहीसा मागे पडला. त्या गडबडीत त्याच्याकडून झालेली चूक त्याला महागात पडली. कार्लसनकडून झालेली चूक चाणाक्ष गुकेशने लगेच हेरली आणि डावावर वर्चस्व मिळवत विजयही साकारला. पारंपरिक पद्धतीच्या बुद्धिबळात पहिल्यांदाच गुकेशने कार्लसनचा पराभव केला. पराभवानंतर कार्लसनने रागाने मूठ टेबलवर आपटली आणि तो तिथून निघून गेला. (Gukesh Stuns Carlsen)

(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Final : सामना जिंकूनही कर्णधार श्रेयस अय्यर शशांक सिंगवर का रागावला?)

पण, सामन्यानंतर डी गुकेश शांत होता. विजयाबद्दलही त्याने अत्यंत संयत प्रतिक्रिया दिली. ‘एरवी १०० पैकी ९९ वेळा हा सामना मी गमावला असता. मी फक्त पराभव पुढे ढकलण्यासाठी खेळत होतो. पण, इतक्यात तो वेळेच्या गणितात फसला. आणि मला संधी मिळाली. मी नशीबवान ठरलो, इतकंच घडलं,’ असं गुकेश सामन्यानंतर म्हणाला. स्पर्धेच्या पहिल्या फेरीतही हे दोन खेळाडू आमने सामने आले होते. आणि यात कार्लसनने आरामात विजय मिळवला होता. पण, दुसऱ्या खेपेला गुकेशने या पराभवाचं उट्टं काढलं आहे. (Gukesh Stuns Carlsen)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.