French Open 2025 : साडेपाच तास चाललेल्या सामन्यात ३ मॅच पॉइंट वाचवत कार्लोस अल्काराझची फ्रेंच ओपनमध्ये सरशी

French Open 2025 : अल्काराझने यानिक सिनरचा चार सेटमध्ये पराभव केला. 

49
French Open 2025 : साडेपाच तास चाललेल्या सामन्यात ३ मॅच पॉइंट वाचवत कार्लोस अल्काराझची फ्रेंच ओपनमध्ये सरशी
  • ऋजुता लुकतुके

निदान क्लेकोर्टवर आपण राफेल नदालचे वारसदार आहोत हे सिद्ध करणारा खेळ करत कार्लोस अल्काराझने यंदा फ्रेंच ओपनवर आपलं सलग दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात त्याने सिनरविरुद्ध ३ मॅचपॉइंट वाचवले. ५ तास आणि २९ मिनिटं हा सामना चालला. अखेर अल्काराझने तो ४-६, ६-७, ६-४, ७-६ आणि ७-६ असा जिंकला. अल्काराझचं हे पाचवं मोठं विजेतेपद आहे. ज्या पद्धतीने त्याने निकराने हा सामना जिंकला त्यासाठी त्याचं कौतुक होत आहे. (French Open 2025)

अंतिम फेरीत पोहोचल्यावर एकदाही अल्काराझचा पराभव झालेला नाही, हा विक्रमही त्याने अबाधित राखला आहे. तर फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासातील हा सगळ्यात लांब सुरू असलेला अंतिम सामना ठरला आहे. चौथ्या षटकात खरा नाट्यमय प्रसंग आला. अल्काराझ ३-५ ने पिछाडीवर होता आणि सर्व्हिस त्याच्याकडे होती. अशावेळी तो ०-४० गुणांनी मागे पडला. त्यामुळे इटलीच्या यानिक सिनरकडे ३ मॅचपॉइंट्स होते. अशावेळी कमालीची जिगर दाखवताना अल्काराझने प्रत्येक पॉइंट लांबवला. रॅलींमध्ये सिनरला गुंतवत त्याने सामन्यात पुनरागमन केलं आणि हा गेम जिंकून पुढे ५-५ अशी बरोबरी साधली. पुढे हा सेटही टायब्रेकरवर गेला आणि इथे ७-६ अशी बाजी मारत अल्काराझने विजेतेपद पटकावलं. सामना जिंकल्यावर तो मैदानावर अक्षरश: कोसळला आणि त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. (French Open 2025)

(हेही वाचा – तरुणाईला Veer Savarkar उमगायला लागले की, हिंदु राष्ट्र निर्माण होईल; गीता उपासनी यांनी व्यक्त केला विश्वास)

अल्काराझचं हे सलग दुसरं फ्रेंच विजेतेपद आहे. या शतकभरात विजेतेपद राखण्याची कामगिरी करणारा तो गुस्ताव कर्स्टन आणि राफेल नदाल यांच्या नंतरचा फक्त तिसरा व्यावसायिक टेनिसपटू आहे. तर गॅस्टन गॉडिलो आणि नोवाक जोकोविचनंतर मॅचपॉइंट वाचवून विजेतेपद पटकावलेलाही तो फक्त तिसरा टेनिसपटू आहे. दोन खेळाडूंमध्ये या झुंजीत फारसा फरक नव्हता. एकूण ३८५ गुणांसाठी झुंज झाली. त्यातील १९३ यानिक सिनरने तर १९२ अल्काराझने जिंकले. पण, विजेतेपद अखेर अल्काराझच्या नावावर गेलं. (French Open 2025)

(हेही वाचा – Bomb Threat नंतर गुजरात उच्च न्यायालयाचे कामकाज झाले बंद)

यात आणखी एक आकडेमोड समोर आली आहे. सामना चार तासांच्या वर गेल्यास तो यानिक सिनरला एकदाही जिंकता आलेला नाही. तर व्यावसायिक टेनिसमध्ये पिछाडी भरून काढत अंतिम सामना जिंकण्याची कामगिरी अल्काराझने तब्बल तीनवेळा केली आहे. यापूर्वी अलेक्झांडर झ्वेरेव आणि नोवाक जोकोविचलाही त्याने पिछाडीवरून हरवलं आहे. २२ वर्षीय अल्काराझने ही किमया आता तिसऱ्यांदा केली. (French Open 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.