Dombivli च्या गर्व शर्माची कमाल; वयाच्या नवव्या वर्षीच कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट पटकावला

12
Dombivli च्या गर्व शर्माची कमाल; वयाच्या नवव्या वर्षीच कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट पटकावला
Dombivli च्या गर्व शर्माची कमाल; वयाच्या नवव्या वर्षीच कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट पटकावला
  • कल्याण : प्रतिनिधी

अभिमानास्पद आणि प्रेरणादायी कामगिरी करत डोंबिवलीतील (Dombivli) अवघ्या ९ वर्षे ५ महिन्यांचा गर्व शर्मा (Garv Sharma) याला शुक्रवारी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. सिनिअर प्रशिक्षक हेमंत धोत्रे यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट कुमार गर्व शर्मा याला देण्यात आला आहे.

गर्वने १२ जानेवारी रोजी प्रशिक्षक वसंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रशिक्षणास सुरूवात केली. वसंत गावकर हे डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) येथील शिवप्रतिमा मित्र मंडळाच्या इमारतीत विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देतात. गर्वने आपल्या समर्पण, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर कराटे या क्रीडाप्रकारात उल्लेखनीय प्रगती केली आहे.

1000527503 scaled

गर्वच्या या प्रवासातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे त्याची प्रशिक्षणाप्रती असलेली निष्ठा. त्याने तब्बल ९८ टक्के उपस्थिती नोंदवून आपल्या मेहनतीचा आणि शिस्तीचा आदर्श घालून दिला आहे. कराटेप्रती असलेल्या आवडीमुळे त्याने विविध स्पर्धांमध्येही सहभाग घेतला असून अनेक पदके जिंकली आहेत.

(हेही वाचा – Mumbai Railway ला अखेर मराठी अधिकारी मिळाला! दीपक काटे यांची नवीन डीआरएमपदी नियुक्ती; रेल्वे बोर्डाचा आदेश जारी)

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी केवळ ५ वर्षांच्या कराटे प्रशिक्षणाच्या प्रवासात गर्वने तब्बल १२ बेल्ट पटकावण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. व्हाईट, यलो, ऑरेंज, ग्रीन, ज्युनिअर ब्लू, ब्लू, ज्युनिअर पर्पल, पर्पल, ज्युनिअर ब्राऊन, ब्राऊन, ज्युनिअर ब्लॅक आणि ब्लॅक, असा त्याचा बेल्टचा प्रवास राहिला आहे.

प्रशिक्षक वसंत गावकर (Vasant Gaonkar) यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणामुळे गर्वने एका छोट्या नवशिक्या खेळाडूपासून एका समर्पित कराटेपटूपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. एवढ्या लहान वयात ब्लॅक बेल्ट पटकावण्याची त्याची कामगिरी ही त्याच्या चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास आणि कराटेप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे. गर्वचे हे उल्लेखनीय यश त्याचे कुटुंबीय, प्रशिक्षक तसेच संपूर्ण डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.