Devendra Jhajhariya Retires : पॅरालिम्पिक खेळाडू देवेंद्र झाझरिया आंतरराष्ट्रीय खेळातूंन निवृत्त

निवृत्तीनंतर देवेंद्र झाझरिया पॅरालिम्पिक समितीचा अध्यक्ष होणार आहे. 

71
Devendra Jhajhariya Retires : पॅरालिम्पिक खेळाडू देवेंद्र झाझरिया आंतरराष्ट्रीय खेळातूंन निवृत्त
  • ऋजुता लुकतुके

पॅरालिम्पिक समितीचा नवनिर्वाचित अध्यक्ष देवेंद्र झाझरियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली निवृत्ती जाहीर केली आहे. आता पूर्णवेळ तो भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या कामकाजात स्वत:ला झोकून देणार आहे. भालाफेकीत पॅरालिम्पिक खेळांमध्ये दोनदा सुवर्ण जिंकून देवेंद्रने विक्रम रचला आहे. भारताचा तो सगळ्यात यशस्वी पॅरालिम्पिक ॲथलीट आहे. २२ वर्षं आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी खेळलेला झाझरिया हा पद्मश्री, खेलरत्न पुरस्कार तसंच अर्जुन पुरस्काराचाही मानकरी ठरला आहे. (Devendra Jhajhariya Retires)

आतापर्यंत तीन पॅरालिम्पिक खेळात देवेंद्रने एफ४६ भालाफेक प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आणि यात दुहेरी सुवर्ण कमावलं आहे. भारतीय पॅरालिम्पिक समितीने वेळेवर कार्यकारिणीच्या निवडणुका न घेतल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने त्यांची मान्यता रद्द केली होती. आणि समितीवर निलंबनाची कारवाई केली होती. पण, मागच्याच आठवड्यात निवडणुकीनंतर ही बंदी आता क्रीडा मंत्रालयाने हटवली आहे. (Devendra Jhajhariya Retires)

(हेही वाचा – Farmer Protest : हातात तलवार घेऊन कोणी आंदोलन करत का? ही अत्यंत लाजिरवाणी बाब…उच्च न्यायालय शेतकऱ्यांवर संतापले)

देवेंद्र झाझरिया केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभार्थी

नवीन झालेल्या निवडणुकीत देवेंद्र झाझरिया हे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. तर त्यांची अख्खी कार्यकारिणीही निवडून आली आहे. त्यांच्या विरोधात इतर कुठल्याही गटाने निवडणूकच लढवली नाही. भारतात ६ मार्चपासून जागतिक पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू झाल्या आहेत. अशावेळी मध्यवर्ती आयोजन संस्था म्हणून पॅरालिम्पिक समितीने काम पाहणं आवश्यक होतं. हे विचारात घेऊन आणि निवडणुकीची तयारी झाल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने संघटनेवरील बंदी हटवली होती. (Devendra Jhajhariya Retires)

देवेंद्रने यापूर्वी पॅरिस पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्याची इच्छा वर्तवली होती. तसंच तो केंद्र सरकारच्या ऑलिम्पिक पोडिअम अर्थात, टॉप्स योजनेचा लाभार्थी आहे. असं असताना, त्याने संघटनेची निवडणूक लढल्यामुळे लोकांच्या भुवया उंचवल्या होत्या. पण, देवेंद्रच्या निवृत्तीनंतर आता हे प्रश्न मिटले आहेत. फक्त पॅरालिम्पिक समितीचं अध्यक्षपदच नाही. तर देवेंद्र आगामी लोकसभा निवडणूकही भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढणार असल्याचं समजतंय. (Devendra Jhajhariya Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.