Davis Cup : डेव्हिस चषकाच्या जागतिक गटात भारताचा मुकाबला स्वीडनशी

नुकतीच भारतीय संघाने पाकिस्तानवर ४-० अशी मात करत स्पर्धेची पुढील फेरी गाठली होती. तर जागतिक गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात स्वीडनला ब्राझीलकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला होता.

122
Davis Cup : डेव्हिस चषकाच्या जागतिक गटात भारताचा मुकाबला स्वीडनशी
  • ऋजुता लुकतुके

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या (Davis Cup Tennis Tournament) जागतिक गटात भारताचा पुढील मुकाबला स्वीडनमध्ये स्वीडनशी होणार आहे. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात ही लढत होईल. नुकतीच भारतीय संघाने (Indian team) पाकिस्तानवर ४-० अशी मात करत स्पर्धेची पुढील फेरी गाठली होती. तर जागतिक गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात स्वीडनला ब्राझीलकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. (Davis Cup)

भारत आणि स्वीडन दरम्यान आतापर्यंत ५ लढती झाल्या असून यात एकदाही भारताला प्रतिस्पर्ध्यांवर मात करता आलेली नाही. यावेळी मात्र भारतीय संघाला (Indian team) विजयाची चांगली संधी आहे. कारण, स्वीडनकडे दमदार एकेरी खेळाडूंची उणीव आहे. हे दोन संघ यापूर्वी २००५ मध्ये नवी दिल्लीत आमने सामने आले होते. तेव्हा भारताला १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. यंदा स्वीडनचा सर्वोत्तम खेळाडू आहे तो एलियास एमर. आणि जागतिक क्रमवारीत तो १६०व्या स्थानावर आहे. तर भारताचा सुमित नागल १२१ व्या स्थानावर आहे. त्यामुळे सुमित एकेरीच्या लढती जिंकू शकतो. (Davis Cup)

(हेही वाचा – Raj Thackeray: इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची ‘ती’ वीट देण्यासाठी राज ठाकरे पुण्यात)

सप्टेंबर महिन्यात स्वीडनमध्ये होणार ही लढत 

भारताची लढत स्वीडन किंवा सर्बियाशी होऊ शकली असती. आणि सर्बियाकडून नोवाक जोकोविच खेळला तर ही लढत भारताला जड गेली असती. त्यामुळे आताचा ड्रॉ भारतासाठी चांगला असल्याचं भारतीय संघाचा कर्णधार रोहीत राजपालने बोलून दाखवलं आहे. स्वीडनकडे येमर आणि त्याचा भाऊ मायकेल (१६६) हे दोन दोनशेच्या आत असलेले खेळाडू आहेत. तर दुहेरीत भारताचं पारडं जड असून रोहन बोपान्ना, युकी भांबरी (६०), श्रीराम बालाजी (७८) आणि विजय सुंदर (८०) हे खेळाडू पहिल्या शंभरांमध्ये आहेत. रोहन बोपान्नाने डेव्हिस चषक खेळणं आता थांबवलं आहे. (Davis Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.