David Warner Retires : ऑस्ट्रेलियाचा अव्वल सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त 

David Warner Retires : भारताविरुद्धचा सामना हा वॉर्नरचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल 

105
David Warner Retires : ऑस्ट्रेलियाचा अव्वल सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त 
David Warner Retires : ऑस्ट्रेलियाचा अव्वल सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त 
  • ऋजुता लुकतुके

सोमवारी भारतीय वेळेनुसार सकाळी अफगाणिस्तानने बांगलादेशचा ८ धावांनी निसटता पराभव केला. त्याचवेळी हे स्पष्ट झालं की, ते उपान्त्य फेरीत जातील तर ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात सुपर ८ मध्येच संपुष्टात आलं. या निकालानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने (David Warner Retires) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सुपर ८ च्या पहिल्या गटात ऑस्ट्रेलियाने एका विजयासह फक्त दोन गुण मिळवले. महत्त्वाचं म्हणजे अफगाणिस्ताननेही त्यांना यावेळी दणका दिला. (David Warner Retires)

(हेही वाचा- T20 World Cup, Afg vs Ban : तालिबानच्या मंत्र्यांनी केलं रशिद खानचं अभिनंदन )

सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी वॉर्नरने शांतपणे आपला निर्णय जाहीर केला. २४ जूनला भारताविरुद्ध झालेला टी-२० सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरलाय. ३७ वर्षीय वॉर्नर जानेवारी २००९ मध्ये आपला पहिला सामना देशासाठी खेळला होता. आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात वॉर्नरने ६ चेंडूंत ६ धावा केल्या. अर्शदीपच्या (Arshdeep) गोलंदाजीवर सूर्यकुमारकडे (Suryakumar) झेल देऊन तो बाद झाला. (David Warner Retires)

 वॉर्नरसाठी निवृत्तीची प्रक्रिया हळू हळू झाली. नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia) एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. तर जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत त्याने कसोटी क्रिकेटला राम राम केलं. तर आता टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर त्याने टी-२० क्रिकेटलाही (T20 Cricket) अलविदा केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. (David Warner Retires)

(हेही वाचा- Om Birla : लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची आवाजी मतदानाने निवड!)

११२ कसोटींत त्याने ४५ धावांच्या सरासरीने ८,७८६ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर तब्बल २६ शतकं आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६२ सामन्यांत त्याने ६,९३२ धावा केल्या आहेत त्या ४८ च्या सरासरीने. टी-२० क्रिकेटमध्ये तो १२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला. यात त्याने ३,२७७ धावा केल्या आहेत. (David Warner Retires)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.